शेतकरी नेते गुरनाम सिंग चढूनी उद्या जंतर-मंतरवर जाणार, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा

Gurnam Singh Chaduni : दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शेतकरी नेते गुरनाम सिंह चढूनी यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. ते उद्या दिल्लीत जाऊन आंदोलकांची भेट घेणार आहेत.

शेतकरी नेते गुरनाम सिंग चढूनी उद्या जंतर-मंतरवर जाणार, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा
Gurnam Singh Chaduni and CJP Protest
Image Credit source: Google
| Updated on: Jul 23, 2026 | 9:58 PM

राजधानी दिल्लीत गेल्या एका महिन्यापासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाला शेतकरी नेते गुरनाम सिंह चढूनी यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. चढूनी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर पोस्ट करत आपल्या समर्थकांना आंदोलनाच्या समर्थनार्थ दिल्लीत पोहोचण्याचे आवाहन केले आहे. चढूनी यांनी असेही सांगितले की, ते स्वतः शुक्रवारी सकाळी 8 वाजता दिल्लीत पोहोचून आंदोलनात सहभागी होणार आहेत.

प्रतिकात्मक उपोषण करणार

गुरनाम सिंह चढूनी चढूनी यांनी प्रस्तावित भारत-अमेरिका व्यापार करारालाही विरोध केला आहे. या मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ते जंतर-मंतर येथे प्रतिकात्मक उपोषण करणार आहेत. ते शुक्रवारी सकाळपासून 25 जुलैच्या संध्याकाळपर्यंत प्रतीकात्मक उपोषणावर बसणार आहेत. त्यांनी आपल्या समर्थकांना आणि आंदोलनाशी संबंधित नागरिकांना मोठ्या संख्येने दिल्लीत येऊन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

शेतकरी नेते म्हणून ओळख

गुरनाम सिंह चढूनी हे दीर्घकाळापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सक्रियपणे आवाज उठवत आहेत. शेतकरी आंदोलनाच्या काळातही त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या प्राधान्याने मांडल्या होत्या. आता त्यांनी जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत या आंदोलनाला व्यापक लोकसमर्थन मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

गेल्या अनेक दिवसांपासून जंतर-मंतर येथे विद्यार्थी आणि आंदोलक विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमितता आणि पेपरफुटी प्रकरणांमध्ये जबाबदारी निश्चित करणे, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करणे तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी यांचा समावेश आहे.

सरकारची भूमिका काय?

आता सरकारकडून या प्रकरणात हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटीच्या प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालये स्थापन करून दोषींना लवकर शिक्षा देण्याची घोषणा केली आहे. मात्र, आंदोलकांचे म्हणणे आहे की, केवळ पेपरफुटीनंतर दोषींना शिक्षा देणे पुरेसे नाही. अशा घटना वारंवार का घडत आहेत, याची कारणे शोधून त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांनाही शिक्षा व्हायला हवी. त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us