प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू, 20 गंभीर जखमी
मोठी बातमी समोर येत आहे, बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून, इतर वीस जण गंभीर जखमी झाले आहेत.

मोठी बातमी समोर येत आहे, बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून, इतर वीस जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी व्यक्तींना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचा चुराडा झाला आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की हा अपघात गुजरातच्या कच्छमध्ये झाला आहे. बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये सात जणांना आपला जीव गमवला आहे. तर वीस जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मिडिया रिपोर्टनुसार हा अपघात गुजरातच्या कच्छमधील केरा-मुंद्रा रोडवर झाला आहे. बसमध्ये 40 प्रवाशी होते. हा अपघात इतका भीषण होता की, बसचा चक्काचूर झाला आहे. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही, मात्र चालकाचं नियंत्रण सूटून हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले, अपघातातील मृतांचा पंचनामा करण्यात आला असून, जखमींना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली, बाराच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त बस ही मुंद्रावरून येत होती तर ट्रक भुजच्या दिशेनं चालला होता. याचदरम्यान हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचा चुरडा झाला आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून, या अपघातातील मृत व्यक्ती आणि जखमींची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
