शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, काचा फोडून बाहेर पडले लोकं
एका शॉपिंग मॉलमध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे लोकांना काचा फोडून बाहेर काढण्यात आले. आगीमुळे परिसरात सगळीकडे धूरच धूर पसरला होता.

Kolkata Shopping mall Fire : कोलकाता येथील एका शॉपिंग मॉलमध्ये मोठी आग लागल्याची माहिती आहे. आग लागली तेव्हा अनेक लोकं आतमध्ये अडकल्याची माहिती देखील पुढे आली आहे. आग लागल्याचे समजताच मॉलमध्ये एकच गोंधळ उडाला. खरेदी करणाऱ्या लोकांना आपत्कालीन गेटमधून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आजूबाजूच्या परिसरात धूरच धूर दिसत होता. अशा स्थितीत मॉलच्या काचा फोडून लोकं बाहेर पडले.
शॉपिंग मॉलमधील आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झालेत. आगीमुळे मॉलच्या आजूबाजूचा परिसर धुराच्या लोटाने भरला होता. मॉलमध्ये अडकलेल्या लोकांना इमर्जन्सी एक्झिटच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले.
कोलकाता के एक शॉपिंग मॉल में आग लग गई हैं, आग की लपटें डरावनी हैं.. साथ ही कई लोगों के अंदर फंसने की भी खबर हैं। महादेव रक्षा करें🙏pic.twitter.com/sVEi18LCO1
— Golu Babu UP Wale (@bhagwadhari_b) June 14, 2024
धुरामुळे अनेकांचा स्वाश गुदमरला होता. पश्चिम बंगालचे अग्निशमन मंत्री सुजित बोस स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत होते.
