AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी आग! 150 दिवसांपासून आग भडकलेलीच, 3 हजार लोक स्थलांतरित

आसामच्या बागजान क्षेत्रात गेल्या 150 दिवसांपासून लागलेली आग अजूनही सुरुच आहे. ही भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ भडकलेली आग बनली आहे. आग विझवण्याच्या प्रयत्नात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे.

भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी आग! 150 दिवसांपासून आग भडकलेलीच, 3 हजार लोक स्थलांतरित
| Updated on: Nov 05, 2020 | 3:42 PM
Share

दिसपूर: ईशान्य भारतात देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी आग अजूनही भडकलेलीच आहे. आसामच्या बागजान क्षेत्रात गेल्या 150 दिवसांपासून लागलेली आग अजूनही सुरुच आहे. 9 जून रोजी एका भीषण गॅस स्फोटात आसाम सरकारच्या ऑईल इंडिया लिमिटेड कंपनीच्या एका गॅस कंटेनरला आग लागली होती. 150 दिवसानंतरही इथं आगीच्या ज्वाळा पाहायला मिळत आहेत. ही भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ भडकलेली आग बनली आहे. आग विझवण्याच्या प्रयत्नात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर परिसरातील 3 हजार नागरिकांवर घर सोडून स्थलांतरितांच्या कॅम्पमध्ये राहण्याची वेळ आली आहे. (The fire at the Oil India Limited project in Assam has been going on for 150 days)

स्थलांतरित झालेल्या लोकांपैकी अनेकजण आपल्या घरी परतले आहेत. पण ज्यांची घरं आग लागलेल्या ठिकाणांपासून जवळ आहेत, त्यांना अजूनही कॅम्पमध्येत राहावं लागत आहे. या आगीत आपली घरं गमावलेल्या 12 कुटुंबांना प्रत्येक 25 लाख रुपये देण्यात आल्याची माहिती ऑईल इंडिया लिमिटेड कंपनीकडून देण्यात आली आहे. तर घरदार सोडून कॅम्पमध्ये राहावं लागत असलेल्या कुटुंबाला कंपनीकडून महिन्याला ५० हजार रुपये देण्यात येत असल्याची माहितीही कंपनीने दिली आहे.

आगीचा मानवी जीवनावर परिणाम

या आगीमुळे फक्त स्थानिक नागरिकांनाच नाही, तर पर्यावरण आणि नैसर्गातील जीवजंतूनाही मोठी हानी पोहोचत आहे. आग लागलेल्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जंगल आणि संरक्षित जलस्त्रोत आहेत. त्याचबरोबर मगुरी-मोटापुंग या वेटलॅन्डमध्ये दुर्लभ प्रजातीची गंगा डॉल्फिनही पाहायला मिळते. मात्र या आगीमुळे पाणी दूषित होत असल्याची माहिती मिळतेय. इतकंच नाही तर एका गंगा डॉल्फिनचा मृत्यू झाल्याचीही बातमी आहे. आग लागली तेव्हा झालेल्या भीषण स्फोटामुळे 5 किलोमीटर परिसरात प्रोपेन, मिथेन, प्रोपलीन आणि अन्य गॅस असं मिश्रण हवेत मिसळलं. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम झाला आहे.

भारतातील मोठ्या आगीच्या घटना

भारतात यापूर्वीही अशाप्रकारची आग पाहायला मिळाली आहे. 1967 मध्ये आसामच्यात शिवसागर जिल्ह्यात ONGCच्या एका प्लॅन्टमध्ये आग लागली होती. ही आग मोठ्या परिश्रमानंतर तब्बल 90 दिवस लागले होते. आंध्र प्रदेशातील ONGC प्लॅन्टमध्ये लागलेली आग विझवण्यासाठी 65 दिवस लागले होते. तर 2005 मध्ये आसामच्या डिकोम इथं ऑईल इंडिया लिमिटेड कंपनीत लागलेली आग २० दिवस चालली होती.

संबंधित बातम्या:

धक्कादायक! अज्ञात व्यक्तीने बस स्थानकाला लावली आग; परिसरातल्या हातगाड्या, सायकलीसुद्धा आगीत फेकल्या

भीषण धडकेत दोन्ही वाहनांनी घेतला पेट, आगीत होरपळून 5 जणांचा जागीच मृत्यू

The fire at the Oil India Limited project in Assam has been going on for 150 days

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.