भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार, देशातील सर्वात मोठी खळबळजनक घटना

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्याच चंद्रशेखर हे जखमी झाले आहेत. आरोपी गोळीबार करुन फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पण या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार, देशातील सर्वात मोठी खळबळजनक घटना
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 6:41 PM

लखनऊ : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथे त्यांच्यावर गोळीबार झालाय. चंद्रशेखर आझाद गाडीने जात होते. यावेळी त्यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात चंद्रशेखर आझाद थोडक्यात बचावल्याची माहिती समोर आली आहे. पण आझाद यांना कंबरेला गोळी चाटून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे ते जखमी झाले आहेत. आझाद यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. संबंधित घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चंद्रशेखर आझाद यांचा देशभरात मोठा चाहता वर्ग आहे. आझाद काही कार्यक्रमासाठी जात होते. खरंतर ते दिल्लीला गेले होते. तिथून ते घरी परतत होते. या दरम्यान ते एका कार्यक्रमस्थळी उपस्थिती लावणार होते. ते ड्रायव्हरच्या बाजूला फ्रंटसीटवर बसले होते. यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले. पण त्यांच्या कंबरेला गोळी चाटून गेली आहे. तसेच गाडीच्या काचा फुटल्या आहेत. गाडीच्या फ्रंटसीटला गोळीमुळे खड्ड पडलं आहे. संबंधित घटनेनंतर गाडीचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये सगळं स्पष्टपणे दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु

चंद्रशेखर हे एका कार्यक्रमासाठी सहारनपूरच्या देवबंद येथे पोहोचले होते. ते त्यांच्या फॉर्चूनर कारने प्रवास करत होते. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संबंधित हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पोलिसांकडून नाकाबंदी करुन आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपींच्या गाडीची नंबरप्लेटवर हरियाणाचा नंबर

चंद्रशेखर यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या आरोपींच्या गाडीचा नंबर हा हरियाणाचा आहे. त्यामुळे आरोपी हरियाणाचे आहेत की त्यांनी नंबरप्लेट बदलली होती, याबाबतचा खुलासा पोलीस तपासात उघड होईल. आरोपींना चार राऊंड फायरिंग केल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात चंद्रशेखर यांच्या गाडीचं नुकसान झालं आहे. त्यांच्या गाडीवर गोळ्या लागल्याच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत.

संबंधित घटनेनंतर भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. आरोपींनी हल्ला का केला, त्यांचा नेमका उद्देश काय होता? त्यांना चंद्रशेखर यांना का जीवे मारायचं होतं? असे प्रश्न निरुत्तर आहेत. पोलीस या प्रश्नांची उत्तरे शोधून काढतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.