नवऱ्यासोबत राहण्यास देणारी, भारतात पहिला घटस्फोट घेणारी महिला, 11 व्या अडकली विवाहबंधनात, प्रकरण पोहोचलं ब्रिटनपर्यंत
त्या काळात नवऱ्याविरोधात उभी राहणारी, नवऱ्यासोबत राहण्यास नकार देणारी महिला... वयाच्या 11 व्या वर्षी अडकली विवाहलबंधनात, घटस्फोटाचं प्रकरण ब्रिटनपर्यंत पोहोचलं तेव्हा...

भारतात आज घटस्फोट होणं फार सामान्य गोष्ट झाली आहे. दिवसागणिक घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. पण भारतात एक काळ असा देखील होता जेव्हा घटस्फोट घेणं काय घटस्फोटाचं नाव घेणं देखील गुन्हा मानला जात होता. पण शतकांपूर्वी, भारतात पहिल्यांदाच एका महिलेला कायदेशीर घटस्फोट मिळाला. त्यासाठी महिलेला मोठा संघर्ष करावा लागला. पण बऱ्याच लोकांना त्या महिलेचं नाव कदाचित माहिती नसेल…
1885 मध्ये भारतातील पहिला कायदेशीर घटस्फोट घेणारी धाडसी महिला रुखमाबाई राऊत होत्या. जेव्हा लोक घटस्फोटाच्या नावालाही घाबरत होते, तेव्हा त्यांनी व्यवस्थेशी लढा दिला आणि स्वतःचे हक्क मिळवले. रुखमाबाई यांचं लग्न वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी झालं. दादाजी भिकाजी असं त्यांच्या पतीचं नाव होतं. दादाजी भिकाजी यांचं वय 19 वर्ष होतं. पण पतीसोबत न जात त्यांनी स्वतःचं शिक्षण सुरु ठेवलं आणि त्यांना मेडिकलमध्ये शिक्षण घ्यायचं होतं. त्यांनी पतीसोबत राहण्यास स्पष्ट नकार दिला. अशात पतीने त्यांच्याविरोधात केस दाखल केली.
त्याकाळी हा फार मोठा विषय झालेला आणि लोकांनी रुखमाबाई राऊत यांच्यावर टीका केला. 1887 मध्ये न्यायालयाने सांगितलं की, रुखमाबाईंनी त्यांच्या पतीसोबत राहावे किंवा 6 महिने तुरुंगवास भोगावा. अशात रुखमाबाईंनी तुरुंगात जाणं आणि पतीसोबत न राहणे मान्य केलं.
रुखमाबाईंचे धाडस ब्रिटिश राजवटीपर्यंत गाजलं. त्यांनी ‘अ हिंदू लेडी’ या नावाने द टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेख लिहिले, ज्यामुळे हे प्रकरण राणी व्हिक्टोरिया यांच्यापर्यंत पोहोचलं. तेव्हा राणी व्हिक्टोरिया यांनी रुखमाबाई यांच्या बाजूने निर्णय घेतला आणि रुखमाबाई यांचा घटस्फोट मंजूर झाला. हा निर्णय केवळ त्यांचा वैयक्तिक विजय नव्हता तर भारतातील महिलांसाठी एक उदाहरण आजही एक उदाहरण आहे.
रुखमाबाईंच्या लढ्यामुळे बालविवाहावर वादविवाद सुरू झाला आणि लग्नाचे किमान वय वाढवण्याच्या दिशेने पावले उचलली गेली. समाजात महिला शिक्षणाबद्दलचे विचारही बदलू लागले. घटस्फोटानंतर रुखमाबाई यांनी London School of Medicine for Women मध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर भारतात आल्यानंतर त्यांनी 35 वर्ष महिलांची सेवा केली आणि मेडिकल क्षेत्रात इतिहास रचला. रुखमाबाई राऊत आजही त्यांच्या हक्कांसाठी उभे राहू इच्छिणाऱ्या महिलांसाठी प्रेरणास्थान आहेत.
