आशा भोसलेंचा नवऱ्याने केला होता छळ, आत्महत्येचा प्रयत्न… म्हणाल्या, 4 महिन्यांची गरोदर असताना…
Asha Bhosle Married Life: आशा भोसले यांचा 20 वर्ष मोठ्या पतीकडून होणारा छळ, 4 महिन्यांच्या गरोदर असताना केलेला आत्महत्येचा प्रयत्न, म्हणाल्या, 'मला त्रास देऊन ते आनंदी होते...', अनेक वर्षांनंतर धक्कादायक खुलासा...

Asha Bhosle Married Life: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना आज प्रत्येक जण प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायिका म्हणून ओळखतो. आपल्या गोड आवाजाने आशा भोसले यांनी फक्त भारतातील चाहत्यांच्या नाही जगभरातील अनेकांच्या मनावर राज्य केलं. पण पतीच्या मनावर त्या राज्य करु शकल्या नाहीत. प्रोफेशनल आयुष्यात आशा भोसले यशाच्या उच्च शिखरावर पोहोचल्या, पण खासगी आयुष्यात मात्र त्यांनी अनेक चढ-उतारांचा सामना केला.
आशा भोसले यांनी नुकताच प्रकाशित झालेल्या ‘आशा भोसले: ए लाईफ इन म्यूजिक’ या बायोग्राफीमध्ये स्वतःच्या खासगी आयुष्यावर अनेक खुलासे केले आहेत. आशा भोसले यांनी लग्न आणि पतीबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आशा भोसले यांचे पती त्यांच्यापेक्षा 20 वर्ष मोठे होते. वैवाहिक आयुष्यातील अनेक घटनांबद्दल आशा भोसले यांनी सांगितलं आहे.
आशा भोसले म्हणतात, ‘माझ्या पतीला राग फार लवकर यायचा. कदाचित त्यांना त्रास द्यायला आवडत असेल… त्यांंना आनंद मिळत होता. मला दुःखी पाहिल्यानंतर त्यांना आनंद मिळत होता. पण घरातील गोष्ट बाहेर कोणालाच माहिती पडत नव्हती… मी कायम त्यांचा सन्मान केला आणि त्यांना कधीच प्रश्न केले नाहीत…’
आशा भोसले पुढे म्हणाल्या, ‘मी फक्त हिंदू धर्मानुसार, माझ्या कर्तव्याचं पालन केलं.’ बायोग्राफीमध्ये आशा भोसले यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. जेव्हा भावनात्मक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून आशा भोसले यांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला.
‘मी अस्वस्थ आणि चार महिन्यांची प्रेग्नेंट होती. एका रुग्णालायता झोपली होती. जो मला नर्क वाटत होता. होणाऱ्या त्रासाला कंटाळून मी झोपेच्या गोळ्यांची पूर्ण एक बाटली खाऊल टाकली. पण माझ्या जन्माला न आलेल्या बाळासाठी माझं प्रेम प्रबळ होतं. त्या प्रेमने मला मृत्यूच्या दारातून परत आणलं आणि माझे प्राण वाचले.’ असा धक्कादायक खुलासा आशा भोसले यांनी केला आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याबद्दल काय म्हणाल्या आशा भोसले?
2023 मध्ये झालेल्या कार्यक्रमात आशा भोसले यांनी मोठी बहीण आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासोबत असलेल्या आठवणी ताज्या केल्या. ‘लहानपणी आमचं आवज सारखीच होती. जर मी त्यांच्यासारखी गात असती तर मला कोणीच कामावर ठेवलं नसतं… त्यामुळे मी माझी स्वतःची एकल शैली तयार केली…’ आज आशा भोसले यांना कोणत्याच ओळखीची गरज नाही.
