ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर भीषण अपघात, कार दरीत कोसळून पाच ठार

उत्तराखंडच्या (Uttarakhand) न्यू टिहरी परिसरात ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. कारचे नियंत्रण सुटून कार दरीत कोसळली या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.

ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर भीषण अपघात, कार दरीत कोसळून पाच ठार
उत्तराखंडमध्ये भिषण अपघात
अजय देशपांडे

|

May 08, 2022 | 2:47 PM

उत्तराखंडच्या (Uttarakhand) न्यू टिहरी (New Tehri) परिसरात ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. कारचे नियंत्रण (Car Accident) सुटून कार दरीत कोसळली या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, मृतदेह दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. महामार्गावर अचानक कारवरील नियंत्रण सुटल्याने कार 250 मीटर  खोल दरीत कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की, या कारमध्ये असलेल्या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात अंदाजे सकाळी सातच्या सुमारास झाला. हे कुटुंब ऋषिकेशवरून चमोलीला जात होते. याच दरम्यान हा अपघात झाला आहे.

मृतांमध्ये तीन महिला, दोन पुरूष

देवप्रयोग पोलीस ठाण्याचे इनचार्ज देवराज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार हे कुटुंब ऋषिकेशवरून चमोलीला जात होते. याच दरम्यान अंदाज सकाळी सात वाजेच्या सुमारास ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर हा अपघात घडला. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश होता. ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार 250 मिटर दरीत कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला.

पोलीस घटनास्थळी दाखल

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कार दरीत कोसळल्याने मृतदेहांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. पोलिसांसोबतच एसडीआरएफचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. अपघात स्थळी गर्दी झाली होती. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमी अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें