
गेल्या अकरा वर्षांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशाची सांस्कृतिक प्रगती मोठ्या प्रमाणात झाली आहे. मोदी सरकारने कर्नाटकातील हंपी मंदिरांपासून ते शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य परंपराही जपण्याचा तसेच हा वारसा समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारताच्या समृद्द वारशाला आणखी समृद्ध करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न राहिलेला आहे.
मोदी सरकारने आपल्या 11 वर्षांच्या कार्यकाळात भारताचे प्राचीन ज्ञान वेगवेगळ्या माध्यमांतून जतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर खुबीने केलेला आहे. सरकारच्या याच प्रयत्नांमुळे भारताचा खरा आत्मा जगासमोर आला आहे.
भारत सरकार गेल्या काही वर्षांपासून भारताचा सांस्कृतिक वारसा जपण्याचे तसेच तो खोलवर रुजवण्याचे काम करत आहे. भव्य असा काशी विश्वनात कॉरिडॉर तसेच अयोध्येतील राम मंदीर ही त्याचीच उदाहरणे आहेत. हे सरकार तीर्थक्षेत्रांत आधुनिक सुविधा प्रदान करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच भारतीय संस्कृतीला पुनरुज्जीवित करण्याचाही सरकारकडून प्रयत्न केला जात आहे.
काशी विश्वनाथ कॉरिडॉर, उत्तर प्रदेश- सरकारने प्राचीन घाट, अरुंद गल्ल्या आणि मंदिरात प्रवेश सुधारून वाराणसीचे पुनरुज्जीवन केले.
महाकाल लोक प्रकल्प, मध्यप्रदेश- महाकालेश्वर मंदीर परिसरात अनेक सुधारणा केल्या. येथे पायाभूत सुविधा तसेच अन्य इतर सुविधांत सुधारणा केली. यामुळे यात्रेकरूनां त्यांचा प्रवास सुखर आणि आरामदायी होतो.
मा कामाख्या मंदीर- आसाम- या मंदीर परिसरातील पायाभूत सुविधांत सुधारणा करण्याचा सरकारने प्रयत्न केलेला आहे. भक्तांना आध्यात्मिक अनुभव यावा यासाठी यात्रेकरुंच्या सुविधा वाढवण्याचा सरकारने प्रयत्न केला.
राम मंदीर- अयोध्या- अयोध्येत या मंदिराचे ऑगस्ट 2020 मध्ये भूमिपूजन केले. तसेच 22 जानेवारी 2024 रोजी या मंदिराचे लोकार्पण झाले.
केदारनाथ मंदीर- उत्तराखंड – या मंदीर परिसरात सरकारने आदी शंकराचार्यांचा पुतळा स्थापन केला.
जुना सोमनाथ मंदीर- गुजरात- सरकारने या भागात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीर्थस्थळांचे पुनरुज्जीवन करण्याचा वारसा पुढे चालू ठेवला. गुजरातमध्ये पार्वती मंदीर, सोमनाथ मंदीर या परिसरात अनेक विकासकामं करण्यात आली.
चारधाम महामार्ग प्रकल्प- यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ आणि कैलास-मानसरोवर यात्रा मार्गाला जोडणाऱ्या 5 NH या महामार्गात अनेक सुधारणा करण्यात आल्या. जुलै 2024 पर्यंत 616 किमीचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाअंतर्गत एकूण 825 किमी रस्त्याचा विकास करण्यात येणार आहे.
हेमकुंड साहीब रोपवे – त्तराखंडमधील गोविंदघाट ते हेमकुंड साहिबजी पर्यंत 12.4 किमी रोपवे मंजूर केलेला आहे. या प्रकल्पाची किमंत प्रकल्पाची किंमत 2,730.13 कोटी रुपये आहे.
बौद्ध सर्किट- सरकारने बौद्ध सर्किटचाही विकास करण्याचे ठरवले आहे. या अंतर्गत उत्तर प्रदेशमधील (2016-17) श्रावस्ती, कुशीनगर, कपिलवास्तूच्या विकासासाठी 87.89 कोटी रुपये दिले आहेत. तसेच आंध्र प्रदेशमधील (2017-18) शालिहुंडम, अमरावतीच्या विकासासाठी 35.24 कोटी रुपये दिले आहेत. तसेच बिहारमधील (2016-17): बोधगया कन्व्हेन्शन सेंटरसाठी 95.18 कोटी रुपये मंजूर केले आहेत. गुजरात मधील जुनागढ, भरुच या भागाच्या विकासासाठी सरकारने 26.68 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. तसेच मध्य प्रदेशमधील (2016-17) सांची, धार, रीवा या भागाच्या विकासासाठी 74.02 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
करतारपूर साहिब कॉरिडॉरचे 9 नोव्हेंबर 2019 रोजी उद्घाटन करण्यात आले. तसेच भारतीय शीख यात्रेकरूंना व्हिसाशिवाय पाकिस्तानमधील गुरुद्वारा दरबार साहिबला भेट देता येईल यासाठी प्रयत्न केले.