VIDEO: सिद्धरामय्यांचं महिलेशी गैरवर्तन, माईक हिसकावताना पदर हाती

बंगळुरु: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. सिद्धरामय्या यांनी एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा, तसंच जाहीर धमकावल्याचा आरोप आहे. याप्रकरणाचा व्हिडीओ समोर आला आहे. याप्रकरानंतर भाजपने सिद्धरामय्या यांची हकालपट्टी करावी अशी मागणी राहुल गांधींकडे केली आहे. जमीला नावाची संबंधित महिला म्हैसूरमध्ये माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे तक्रार घेऊन गेली होती. …

VIDEO: सिद्धरामय्यांचं महिलेशी गैरवर्तन, माईक हिसकावताना पदर हाती

बंगळुरु: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. सिद्धरामय्या यांनी एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा, तसंच जाहीर धमकावल्याचा आरोप आहे. याप्रकरणाचा व्हिडीओ समोर आला आहे. याप्रकरानंतर भाजपने सिद्धरामय्या यांची हकालपट्टी करावी अशी मागणी राहुल गांधींकडे केली आहे.

जमीला नावाची संबंधित महिला म्हैसूरमध्ये माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे तक्रार घेऊन गेली होती. जमीला या सिद्धरामय्यांच्या आमदार पुत्राची तक्रार करण्यासाठी आल्या होत्या. मात्र जमीला यांनी बोलण्यास सुरुवात करताच सिद्धरामय्या भडकले आणि त्यांनी महिलेच्या हातातून माईक काढून घेतला. माईक काढून घेताना महिलेच्या साडीचा पदरही खाली घसरला. तो त्या महिलेने तातडीने सावरला. मात्र जमीला आपल्या तक्रारीचा पाढा वाचताना, सिद्धरामय्यांनी तिच्या खांद्याला पकडून, ओरडून खाली बसवलं.

म्हैसूरमधील ही संपूर्ण घटना उपस्थित मीडिया कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. हा व्हिडीओ सार्वजनिक झाल्यानंतर वादाला तोंड फुटलं.

भाजपकडून कारवाईची मागणी
याप्रकारानंतर भाजपने काँग्रेस वरिष्ठांकडे सिद्धरामय्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजपने या बहाण्याने काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी आणि अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही टीकास्त्र सोडलं.

कोण आहेत सिद्धरामय्या
सिद्धरामय्या हे काँग्रेसचे बडे नेते आहेत

सिद्धरामय्या यांनी 2013 ते 2018 पर्यंत कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे.

ते सध्या काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारीणीचे सदस्य आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *