दोनदा वॉशरुममध्ये पडले… थेट एम्समध्ये भरती; काय झालं माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना?
Jagdeep Dhankhar Health Update : देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यानंतर त्यांना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेदिक विज्ञान संस्था (एम्स) मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नवी दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यानंतर त्यांना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेदिक विज्ञान संस्था (एम्स) मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जगदीप धनखड हे 74 वर्षांचे आहेत. त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार ते 10 जानेवारी रोजी बाथरूममध्ये दोनदा बेशुद्ध पडले, त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखस करण्यात आले आहे. आता त्यांच्या काही चाचण्या केल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जगदीप धनखड कधी बेशुद्ध पडले?
समोर आलेल्या वृत्तानुसार, जगदीप धनखड यापूर्वी अनेक वेळा बेशुद्ध पडले आहेत. ते कच्छचे रण, उत्तराखंड, केरळ आणि दिल्लीत बेशुद्ध पडले होते. या सर्व ठिकाणी उपराष्ट्रपती म्हणून सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावली असताना या घटना घडल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव 21 जुलै रोजी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. आता राजीनाम्यानंतरही ते बेशुद्ध पडत असल्याचे समोर आले आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिला होता राजीनामा
संसदेचे गेले पावसाळी अधिवेशन 21 जुलै 2025 रोजी सुरू झाले होते. या पहिल्या दिवशी जगदीप धनखड यांनी दिवसभर राज्यसभेचे पाहिले. त्यानंतर त्याच रात्री त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना त्यांना आरोग्याच्या समस्यांचा उल्लेख केला होता. त्यावेळी विरोधी पक्ष आणि अनेक राजकीय विश्लेषकांनी त्यांच्या अचानक राजीनाम्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. विरोधकांनी धनखड यांनी यांनी आरोग्याच्या कारणामुळे नव्हे तर इतर कारणामुळे राजीनामा दिला असल्याचे म्हटले होते.
निवासासाठी सरकारला पत्र
काही दिवसांपूर्वी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर सरकारी निवासस्थान मिळाले नसल्याबाबत सरकारला पत्र लिहिले होते. देशाच्या माजी उपराष्ट्रपतींना भारत सरकारकडून अनेक फायदे मिळतात. यात दरमहा 2 लाख रुपये पेन्शन, टाइप 8 बंगला, एक वैयक्तिक सचिव, एक अतिरिक्त वैयक्तिक सचिव, एक वैयक्तिक सहाय्यक, एक डॉक्टर, एक नर्सिंग अधिकारी आणि चार वैयक्तिक सहाय्यक यांचा समावेश असतो.
