पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर जमा व्हा, राहुल गांधी यांचं देशवासियांना आवाहन

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर काल झालेल्या लाठीमार नंतर आज पुन्हा एकदा आंदोलन चिघळलं आहे. तरुण आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मोदींच्या निवासस्थानी धरणे आंदोलन सुरू केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर जमा व्हा, राहुल गांधी यांचं देशवासियांना आवाहन
rahul gandhi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 21, 2026 | 5:47 PM

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर काल झालेल्या लाठीमार नंतर आज पुन्हा एकदा आंदोलन चिघळलं आहे. तरुण आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मोदींच्या निवासस्थानी धरणे आंदोलन सुरू केलं आहे. तसेच प्रत्येक देशवासियांना मोदींच्या घरासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून हे आवाहन केलं आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटरवर ट्विट करून हे आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकाही केली आहे. विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला म्हणजे प्रत्येक भारतीय कुटुंबावर झालेला हल्ला आहे. पंतप्रधान मोदींना वाटतं की, कोणतीही उत्तर न देता आणि कोणत्याही परिणामांना सामोरं न जाता ते यातून सुटू शकतात; पण यावेळी ते अजिबात शक्य होणार नाही. ज्या प्रत्येक देशभक्त भारतीयाला वाटतं की, आपल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळायला हवा, अशा प्रत्येकाला माझं आवाहन आहे, पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आयोजित आमच्या धरणे आंदोलनात सहभागी व्हा, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे. देशातील विद्यार्थ्यांचा आवाज दुर्लक्षित करता येणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मोदींच्या निवासस्थानासमोर आंदोलन

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आज दुपारी जंतरमंतरवर आले. यावेळी त्यांनी अभिजीत दीपके यांच्याशी संवाद साधला. तसेच आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोरच त्यांनी धरणे आंदोलन सुरू केलं आहे. हे धरणे आंदोलन सुरू असतानाच राहुल गांधी यांनी आता या आंदोलनात देशवासियांना सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

मला अर्धा किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं

दरम्यान, ज्या आंदोलकांना काल पोलिसांनी मारहाण केली, त्या आंदोलकांनी आज पत्रकार परिषद घेऊन पोलिसांच्या अमानुषतेचा पाढाच वाचला. दिल्ली पोलीस आम्हाला मारत होती. साध्या वेशात येऊन त्यांनी आम्हाला मारहाण केली. त्यांच्या खिशाला नेम प्लेट नव्हती. जे आंदोलन करत होते त्यांच्यावर लाठी चालवली, अश्रू धुराच्या नळकांड्या तुम्ही फोडल्या. आम्ही केरळ भवन परिसरात पोहोचलो तेव्हा पोलिसांनी ट्रकमध्ये असलेल्यांवर लाठीचार्ज केला. मला पोलीस अर्धा किलोमीटर फरफटत घेऊन गेले. एलआयसी इमारतीच्या जवळ इतर आंदोलकांना आतमध्ये घेऊन मारहाण केली, असं या आंदोलकांनी सांगितलं.

 

आता मागे नाहीच

जंतर मंतर कालच्या हिसेनंतर देखील भरलेलं आहे. आंदोलन सुरूच राहणार आहे. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असं या आंदोलकांनी सांगितलं.

Follow Us