गौतम अदानी यांचा जगन्नाथ रथयात्रेत सहभाग, म्हणाले हा अनुभव जीवनभर लक्षात राहील…
अदानी ग्रुपचे सर्वेसर्वा गौतम अदानी संपूर्ण कुटुंबासह ओरीसाच्या जगप्रसिद्ध जगन्नाथ यात्रेत सहभागी झाले.त्यांनी येथील किचनमध्ये जाऊन सेवाही दिली. आपण भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी भगवान जगन्नाथाकडे प्रार्थना केल्याचे सांगितले.

ओरीसातील प्रसिद्ध जगन्नाथ यात्रेला अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांनी सह कुटुंब भेट दिली. गौतम अदानी त्यांची पत्नी प्रीती अदानी आणि मुलगा करण अदानी अशा संपूर्ण कुटुंबाने आज ओरीसातील जगन्नाथ यात्रेत सहभागी होत भगवान जगन्नाथ यांचे दर्शन घेत आशीवार्द घेतले. त्यांनी हाथ जोडून रथाला प्रणाम केला आणि रथाला स्पर्श करुन भगवान जगन्नाथाचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर गौतम अदानी यांनी इस्कॉन किचनमध्ये जाऊन महाप्रसाद बनविण्यासाठी सेवाही केली. जोरदार पाऊस सुरु असतानाही अदानी ग्रुपचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी श्रद्धापूर्वक या जगन्नाथ यात्रेत श्रमदानही केले.
‘सेवेतून साधने’चा प्रयत्न
यावेळी उद्योजक गौतम अदानी यांनी भगवान जगन्नाथाचे दर्शन घेतल्यानंतर मीडियाशी संवाद देखील साधला. ते यावेळी म्हणाले की, ‘स्वत: प्रभू लोकांमध्ये येत आहेत. हा केवल एक आध्यात्मिक सण नाहीए तर पण एक असा सण आहे जो अहंकाराच्या समोर नम्रतेला महत्व असते याची प्रचिती देतो आहे. या सणात यायचे मला सौभाग्य प्राप्त झाले आणि हा अनुभव जीवनभर माझ्या लक्षात राहील. मला सर्व मिळाले, माझ्याकडे काही नव्हते.लोकांच्या कृपेने, देवाच्या कृपेने आज माझ्याकडे सर्वकाही आहे. आपल्या भारतवर्षाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि ओरिसाच्या उत्थानासाठी भगवान जगन्नाथांकडे प्रार्थना केल्याचेही अदानी यांनी यावेळी सांगितले.
सेवेची अनुभूती मिळाली
प्रयागराज येथील महाकुंभातही आम्ही ‘सेवेतून साधने’चा प्रयत्न केला होता असेही त्यांनी सांगितले. प्रयागराज येथे पाच हजार कर्मचारी सामील झाले होते. कार्पोरेट जगतातही या सेवेची अनुभूती मिळाली आहे. जगन्नाथ यात्रेतही हा अनुभव घेत आहे. पुरी प्रशासन, ओरीसा सरकार यांनी या यात्रेसाठी योग्य बंदोबस्त आणि चोख व्यवस्था केलेली आहे. 10 ते 15 लाख श्रद्धाळू येते आलेले आहेत. पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जगन्नाथ यात्रेचे ज्या प्रकारे आयोजन केले आहे त्याबद्दल मी त्यांचे सर्वांच्यावतीने आभार मानत आहे असेही गौतम अदानी यांनी यावेळी सांगितले.
प्रसाद सेवेत सामील झाले गौतम अदानी
भगवान जगन्नाथांच्या दर्शनानंतर गौतम अदानी आणि त्यांची पत्नी प्रीती अदानी यांनी इस्कॉनच्या किचनमध्ये जाऊन श्रद्धाळूंसाठी महाप्रसाद बनविण्यासाठी सेवा दिली. या किचनमध्ये सुमारे 40 लाख श्रद्धाळूंसाठी महाप्रसाद बनवला जात आहे. गौतम अदानी यांनी यावेळी श्रद्धाळूंना प्रसादाचे वितरण देखील केला. गौतम अदानी आणि त्यांची पत्नी प्रीती अदानी यांनी महाप्रसाद सेवेत सहभागी होताना भक्तांसाठी पुऱ्या तयार केल्या. त्यानंतर त्यांनी जमीनीवर बसून भाजी आणि फळे देखील कापली. त्यांनी संपूर्ण किचनची व्यवस्था आणि मॅनेजमेंटची पाहणी देखील केली. महाप्रसाद बनविण्याची संपूर्ण प्रक्रीया यावेळी जवळून पाहीली.
