AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थर्टी फर्स्टच्या चिकन बिर्यानीतून तरूणीचा मृत्यू

केरळातील एका 20 वर्षीय तरूणीचा चिकन बिर्यानीतून विषबाधा झाल्याने मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे याआधी एका नर्सचाही अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात फूड पॉयझनने मृत्यू झाला होता.

थर्टी फर्स्टच्या चिकन बिर्यानीतून तरूणीचा मृत्यू
KERALAImage Credit source: KERALA
| Updated on: Jan 07, 2023 | 4:21 PM
Share

केरळ : थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी ऑनलाईन (online ) मागविलेल्या चिकन बिर्यानीने (biryani) केरळातील ( keral) कासारागोड येथील थलकलयी गावातील एका तरूणीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे आठवडाभरापूर्वी कोझीकोडे येथील कोट्टयम मेडीकल कॉलेजच्या एका नर्सचा अशाप्रकारे जेवणातून विषबाधा होऊन मृत्यू झाला होता.

अंजूश्री पार्वती (20 ) हीने अल रोमानसिया रेस्ट्रोरंटमधून चिकन ऑनलाईन बिर्यानी मागवली होती. हे अन्न खाल्ल्यानंतर तिच्या घरातील पाच सदस्यांना अस्वस्थ वाटू लागले. सात दिवसानंतर अंजूश्री हीचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला. तिची आई अंबिका, भाऊ श्रीकुमार ( 18 ), तिच्या 19 वर्षीय कझीन्स श्रीनंदना, अनुश्री यांना उलट्या आणि पोटदुखी सुरू झाली होती.

अंजुश्री हीची आई अंबिका आणि भाऊ यांच्या अजूनही पोटात दुखत असून तिचे इतर नातलग यांची प्रकृती सुधारली आहे. परंतू अंजूश्रीला खूप उलट्या झाल्याने तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, केरळाच्या आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

महापौर रितू तावडेंचे अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाईचे आदेश
महापौर रितू तावडेंचे अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाईचे आदेश.
आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? शंभुराज देसाईंचा थेट सवाल
आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? शंभुराज देसाईंचा थेट सवाल.
स्पिरीट ऑफ मुंबईच्या नावाखाली लोकलचा जीवघेणा प्रवास! व्हिडीओ व्हायरल
स्पिरीट ऑफ मुंबईच्या नावाखाली लोकलचा जीवघेणा प्रवास! व्हिडीओ व्हायरल.
टी20 विश्वचषकात उलटफेर: झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवले
टी20 विश्वचषकात उलटफेर: झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवले.
चंद्रपूर : भाजप-ठाकरे गटाची युती, मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल
चंद्रपूर : भाजप-ठाकरे गटाची युती, मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल.
रोहित पवारांच्या आरोपांवर प्रफुल पटेलांकडून खुलासा
रोहित पवारांच्या आरोपांवर प्रफुल पटेलांकडून खुलासा.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलिनीकरणावर संभ्रम
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलिनीकरणावर संभ्रम.
रोहित पवार यांच्या नव्या ट्विटने खळबळ, तो संदर्भ देत म्हणाले...
रोहित पवार यांच्या नव्या ट्विटने खळबळ, तो संदर्भ देत म्हणाले....
उचलली जीभ, लावली दाढीला, असं करू नका! राऊतांचा शिंदेंना खोचक सल्ला
उचलली जीभ, लावली दाढीला, असं करू नका! राऊतांचा शिंदेंना खोचक सल्ला.
सुनेत्रा पवार यांच्या बैठकांचं सत्र; विजयी उमेदवारांना भेटणार
सुनेत्रा पवार यांच्या बैठकांचं सत्र; विजयी उमेदवारांना भेटणार.