AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भारतीय मुस्लिमांच्या हातात फक्त 15 मिनिटे सत्ता द्या, मग…’, ओवैसीच्या पक्षातील बड्या नेत्याने नेमके काय म्हटले?

देशाच्या उभारणीत आणि प्रगतीत मुस्लिमांनी एक मजबूत भूमिका बजावली आहे. मुस्लीम समाजाची ही भूमिका विसरता येणार नाही. ऑपरेशन सिंदूरसाठी भारतीय सैन्याने केलेल्या कामगिरीचे जमई यांनी कौतुक केले. तसेच या मोहिमेशी संबंधित माहिती माध्यमांना देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचेही स्तुती केली.

'भारतीय मुस्लिमांच्या हातात फक्त 15 मिनिटे सत्ता द्या, मग...', ओवैसीच्या पक्षातील बड्या नेत्याने नेमके काय म्हटले?
Shoaib Jamai
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 09, 2025 | 9:15 AM
Share

India Strikes in Pakistan: भारतीय लष्कराने पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरु केले आहे. हे ऑपरेशन संपले नसल्याचे भारताने स्पष्ट केले. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहे. या कारवाईनंतर पाकिस्तानमधून चालणारा दहशतवाद मुळासकट संपवण्याची मागणी होत आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजे एआयएमआयएमच्या नेत्याने मोठी मागणी केली आहे.

मुस्लिमांकडे फक्त 15 मिनिटे सत्ता द्या

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष शोएब जमई यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे. त्याचा वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारताच्या मुस्लिमांकडे फक्त 15 मिनिटे सत्ता द्या. त्यानंतर पाकिस्तानला कसे नष्ट करु, हे आम्ही दाखवून देऊ. भारतातील मुस्लिमांनी ‘द्विराष्ट्र सिद्धांत’ आधीच नाकारला असल्याचे शोएब जमई यांनी सांगितले.

शोएब जमई म्हणाले, देशाच्या उभारणीत आणि प्रगतीत मुस्लिमांनी एक मजबूत भूमिका बजावली आहे. मुस्लीम समाजाची ही भूमिका विसरता येणार नाही. ऑपरेशन सिंदूरसाठी भारतीय सैन्याने केलेल्या कामगिरीचे जमई यांनी कौतुक केले. तसेच या मोहिमेशी संबंधित माहिती माध्यमांना देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचेही स्तुती केली.

एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही ऑपरेशन सिंदूरचे कौतूक केले. नुकतेच एका सार्वजनीक सभेत ओवैसी यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ आणि ‘हिंदुस्तान जिंदाबाद’ या घोषणा दिल्या होत्या. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी त्यांच्याकडून सातत्याने करण्यात येत होती. देशाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करु नये. तसेच या प्रसंगी आपण सर्व एक आहोत, हे दाखवून देऊ. ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानसाठी एक संदेश आहे. या माध्यमातून भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या ह्रदयात असलेले अथांग प्रेम दिसत आहे, असे ओवैसी यांनी म्हटले.

भारताने पाकिस्तामधील दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये केलेल्या हत्येचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवली. या मोहिमेत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची नऊ तळ उद्धवस्त करण्यात आली. भारताच्या या कारवाईचा धसका पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी घेतला आहे.

Follow Us
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी खाद्य तेलाबाबत घोषणा केलीच...
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी घोषणा केलीच...  खाद्य तेलाबाबत एफडीएकडून कडक नियमावली
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरेंवर
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरे गटावर निशाणा!
पोलिस संरक्षण काढून ये मग... फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर,
Video : पोलिस संरक्षण काढून ये मग...  फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर, थेट बुलेटस्वारी करत स्वीकारलं चॅलेंज
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत, असं काही घडलं की...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कोर्टात काय...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कामत यांचा युक्तिवाद, ठाकरेंना जिंकून देणार?
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेच्या वकीलांची मोठी मागणी
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांची कोर्टाकडे मोठी मागणी
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अंबाझरी तलावाची पाहणी, नागपूरच्या वैभवाल
अंबाझरी तलावाचे पुनरुज्जीवन, पर्यटन आणि जलक्रीडा केंद्र म्हणून विकासाची फडणवीस यांची घोषणा
मराठा आरक्षणासाठी दातेंच्या उपोषणाची धार कायम
मराठा आरक्षणासाठी राजेंद्र दातेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस