
नॉर्थ गोव्याच्या अरपोरा येथील बर्च बाय रोमियो लेन रेस्टॉरंटमध्ये रात्री उशिरा भीषण आग लागली. या दुर्घटनेत आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुतांश रेस्टॉरंटचे कर्मचारी आहेत. कारण ही दुर्घटना किचन जवळ झाली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये चार पर्यटक आहेत. यात तीन महिला आहेत. नाइट क्लबने अग्नि सुरक्षा नियमांचं पालन केलं नव्हतं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सीएमनी स्वत: घटनास्थळी जाऊन आढावा घेतला. सिलिंडर स्फोटामुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. “गोव्याच्या अरपोरा येथे आग लागण्याची घटना खूप दु:खद आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं, त्या सर्वांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकरात लवकर बरे होवोत” असं पीएम मोदींनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करुन परिस्थिती जाणून घेतली. राज्य सरकार पीडित लोकांना शक्य ती सर्व मदत करत आहे. पीएम मोदींनी गोव्याच्या अरपोरा येथील दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला पंतप्रधान मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजाराची मदत जाहीर केली आहे.
गोवा पोलिसांनी काय माहिती दिली?
गोवा पोलिसांनुसार, नॉर्थ गोव्याच्या अरपोरा येथे रोमियो लेन जवळ असलेल्या बर्च बाय रोमियो लेन रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागली. यात 25 जणांचा मृत्यू झाला. यात चार पर्यटक आहेत. 14 स्टाफ मेंबर आहेत. 7 जणांची ओळख अजून पटलेली नाही. 6 लोक जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आग लागण्याचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही. पोलीस आणि अग्निशमन दलाकडून तपास सुरु आहे. कायदेशीर कारवाई सुरु आहे.
#WATCH | Goa | 23 people died after a fire broke out at a restaurant in North Goa’s Arpora.
(Visuals from the spot) pic.twitter.com/HFrDlQeVNe
— ANI (@ANI) December 6, 2025
या क्लबची खासियत काय?
बर्च बाय रोमियो लेन रेस्टॉरेंट डान्स आणि नाइटक्लब आहे. इथे येणारे पर्यटक म्यूझिक आणि रात्री उशिरापर्यंत पार्टी एन्जॉय करायला येतात. भारतातील हा पहिला आयलँड क्लब (First Island Club) आहे. म्हणजे चारही बाजुंनी पाण्याने घेरलेला आहे. आरपोरा नदीवर हा क्लब आहे. हा क्लब पाण्याच्या मधोमध असल्याने आयलँड सारखी फिलिंग येते. आपण कुठल्यातरी बेटावर आहोत असं वाटतं. हे नाइट क्लब रेस्टॉरंट आहे. हा क्लब संध्याकाळी 6 वाजता सुरु होऊन रात्री 2 वाजता बंद होतो. कॉकटेलपासून खाण्या-पिण्याच्या सर्व गोष्टी इथे उपलब्ध होत्या.