AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Goa Night Club Fire : गोव्यात नाईट क्लबमध्ये भीषण अग्नितांडव, 23 जणांचा होरपळून मृत्यू

Goa Night Club Fire : गोवा एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. देशभरातून लाखो लोक गोवा फिरण्यासाठी येत असतात. आता नाताळ जवळ येत आहे. त्यामुळे गोव्यातील ही गर्दी आणखी वाढणार आहे. मात्र, त्याआधीच गोव्यात एक भीषण दुर्घटना घडली आहे. नाईट क्लबला आग लागली. यात अनेकांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Goa Night Club Fire : गोव्यात नाईट क्लबमध्ये भीषण अग्नितांडव, 23 जणांचा होरपळून मृत्यू
Goa Night Club Fire
| Updated on: Dec 07, 2025 | 9:21 AM
Share

गोव्यामध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. गोव्याच्या उत्तरेला अर्पोरा भागात Birch by Romeo Lane नावाचा एक नाईट क्लब आहे. रात्री उशिरा या क्लबला आग लागली. या अग्नितांडवात 23 जणांचा होरपळून मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 50 जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृतांमध्ये 4 पर्यटक आणि 19 नाइट क्लब स्टाफचे सदस्य आहेत. त्यावरुन या अग्नितांडवाची भीषण लक्षात येईल. गॅस सिलिंडर ब्लास्ट या आगीमागे कारण मानलं जात होतं. पण स्थानिक रहिवाशांनुसार त्यांनी कुठलाही स्फोटाचा आवाज ऐकला नाही.

स्थानिकांच्या या स्टेटमेंटनंतर तपास यंत्रणा आगीच्या अन्य संभावित कारणांचा शोध घेत आहे. यात फटाके किंवा सेलिब्रेशनसाठी ठेवलेल्या रसायनं यामुळे सुद्धा आग भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. एलपीजी सिलिंडर स्फोटामुळे ही आग भडकली असावी, असं काही अधिकाऱ्यांचं मत आहे. त्यामुळे सर्व अंगांनी तपास केला जात आहे. गोवा सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. सुरक्षा निकषाचे उल्लंघन, धोकादायक साहित्याची साठवणूक आणि नाइट क्लबमधली सुरक्षा व्यवस्था या सर्व अंगांनी सविस्तर चौकशी सुरु आहे.

गोव्यामधील नाइट क्लब सुरक्षित आहेत का?

मदत आणि बचाव कार्य संपूर्ण रात्रभर सुरु होतं. अधिकारी आणि स्टाफकडून आता मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. मृत आणि जखमींच्या नातेवाईकांना माहिती दिली जात आहे. आता नाताळ जवळ येत आहे. त्यामुळे गोव्यात बीचवर आणि नाईट क्लबमध्ये पर्यटकांची संख्या वाढणार आहे. अशावेळी या नाइट क्बलमधील या अग्नि तांडवामुळे अग्नि सुरक्षा नियमांच कठोरतेने पालन होतय का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

स्थानिक आमदाराने काय माहिती दिली?

स्थानिक आमदार लोबो यांनी पत्रकारांना सांगितलं की, “आगीची माहिती मिळताच फायर ब्रिगेड आणि पोलिसांची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली. संपूर्ण रात्रभर मदत आणि बचाव कार्य सुरु होतं” “अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी सर्व क्लबचं फायर सेफ्टी ऑडिट झालं पाहिजे” असं ते म्हणाले.

अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...
अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया....
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी.
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल.
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर.
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?.
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल.
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!.
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया.
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती.
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर.