Gold, silver prices : गुंतवणूकदारांना मोठा झटका, पुढच्या महिन्यातही सोन्यात घसरण सुरूच राहणार, दर किती कमी होणार?

सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरूच आहे. दरम्यान पुढच्या महिन्यात देखील सोन्याच्या दरात घसरण सुरूच राहण्याचा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आल्याने गुंतवणूकदारांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

Gold, silver prices : गुंतवणूकदारांना मोठा झटका, पुढच्या महिन्यातही सोन्यात घसरण सुरूच राहणार, दर किती कमी होणार?
Gold and silver prices
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 21, 2026 | 8:40 PM

सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातुच्या किमतीमध्ये सातत्याने चढ-उतार सुरू असल्यामुळे आता त्याचा परिणाम हा देशांतर्ग सोन्या-चांदीच्या दरावर देखील होताना दिसत आहे. सध्या सोन्याचे दर एवढे घसरले आहेत की, शनिवारी सोनं आणि चादींचे दर यावर्षीच्या निचांकी पातळीवर पोहोचले आहेत. दरम्यान सोन्याचे दर आणखी किती घसरणार? या घसरणीला कधी ब्रेक लागणार? असे अनेक प्रश्न सध्या गुंतवणूकदारांच्या मनात आहेत. मात्र सोन्या-चांदीच्या दराबाबत आता एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते पुढच्या महिन्यात देखील सोन्याच्या दरात घसरण सुरूच राहणार आहे. यामुळे आता सराफा व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या बदलाची शक्यता खूप कमी असल्याचं देखील तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

अशा या सर्व परिस्थितीमध्ये पुढच्या महिन्यात देखील सोन्याच्या दरात घसरण सुरूच राहणार आहे. सोन्या-चांदीच्या किंमतीवर दबाव कायम राहू शकतो, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आता सोन्यात गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी आधी सराफा बाजाराचा अंदाज घेणं फायद्याचं ठरू शकतं, असं मत काही सराफा व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात आलं आहे. पुढच्या महिन्यात देखील सोन्याच्या दरात घसरण कायम राहील, मात्र सोन्याचे दर कितीने कमी होतील याचा अंदाज सध्या तरी सांगता येऊ शकत नाही, असंही सराफा व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे.

Loading...

या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते डॉलरच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. डॉलर मजबूत होत आहे. याच कारणामुळे सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे. डॉलर मजबूत होत असल्यामुळे मौल्यवान धातुंच्या किमतीवर सध्या अधिक दबाव पहायला मिळत आहे, त्यामुळे पुढच्या महिन्यात देखील घसरण सुरूच राहू शकते, असा अंदाज या क्षेत्रातील गुंतवणूकदारांकडून वर्तवण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये सोन्याच्या दरात प्रति तोळा सात हजार तर चादींच्या दरात प्रति किलो दहा हजार रुपयांची घसरण झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us