Gold Price Today : महिन्याचा पहिला दिवस अन् पहिलाच घाव… सोन्याचे भाव ऐकून घाम फुटेल; युद्धाच्या काळात…

Gold Price Today 1st April 2026 : आंतराराष्ट्रीय बाजारप्रमाणेच देशांतर्गतही सोन्या- चांदीच्या किंमतीत सतत चढउतार होताना दिसता. मार्च महिन्यात सोन्याचे भाव खाली घसरले होते. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाही तोच ट्रेंड कायम राहिलाय की सोन्याचे दर वाढलेत ? जाणून घ्या आज सोनं-चांदी महाग झालं की स्वस्त...

Gold Price Today : महिन्याचा पहिला दिवस अन् पहिलाच घाव... सोन्याचे भाव ऐकून घाम फुटेल; युद्धाच्या काळात...
सोन्यामुळे खिशावर किती पडणार भार ?
| Updated on: Apr 01, 2026 | 11:49 AM

आज 1 एप्रिल, देशात नवीन आर्थिक वर्षाची आजपासून सुरूवात होत आहे. इराणचे इस्रायल आणि अमेरिकेशी सुरू असलेलं युद्ध,सतत वरखाली होणार डॉलर आणि एकंदर जागतिक स्थिती याचा परिणाम सोनं-चांदी या मौल्यवान धातूंवर होताना दिसत आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीलाच देशात सोन्याच्या किंमतीत वाढ झालेली दिसून आली असून सोन्याचे दर वर गेले आहेत. जागतिक बाजारातील वाढत्या किमती, देशातील लग्नसराईच्या हंगामापूर्वी सराफांकडून होणारी नवीन खरेदी आणि रुपयाचे अवमूल्यन ही या दरवाढीमागची कारणं आहेत. आज, 1 एप्रिलच्या सकाळी, राजधानी दिल्लीत 24 -कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 1 लाख 49 हजार 670 रुपयांवर पोहोचला आहे. तर मुंबईत 10 ग्रॅम सोन्यासाठी आता 1 लाख 49 हजार 520 रुपये मोजावे लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस 4,652.31 डॉलर इतका आहे.

याच दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्धासंदर्भात एक धक्कादायक विधान केलं आहे. इराणसोबत सुरू असलेले युद्ध पुढील दोन ते तीन आठवड्यांत संपू शकते, असं ट्रम्प यांनी म्हटलंय. अमेरिकेने आपली लष्करी उद्दिष्ट्ये मोठ्या प्रमाणात साध्य केली आहेत आणि आता या प्रदेशातून बाहेर पडण्याची तयारी करत आहेत, असे संकेत त्यांनी दिलेत.

गेल्या महिन्यात म्हणजे 2 मार्च ते 30 मार्च 2026 या काळात दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 21,300 रुपयांनी किंवा 12.3 टक्क्यांनी घसरला. चांदीचा भाव 63 हजार रुपये किंवा 21 टक्क्यांनी घसरल्याचे दिसून आलं.

आज देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर

दिल्लीत सोन्याची किंमत : दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,49,670 आहे. 2 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 1,37,210 आहे.

मुंबईत व कलकत्ता येथे सोन्याचे दर : सध्या मुंबईत आणि कलकत्ता येथे 22 कॅरेट सोनं हे 1,37,060 रुपयांना मिळतं तर 24 कॅरेट सोन्याचे दर 1,49,520 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके आहेत.

चेन्नईमध्ये सोनं कितीला ? : 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,49,120 रुपये इतका आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,36,690 रुपये आहे.

पुणे व बंगळुरूत सोन्याचे दर : या दोन शहरांमध्ये, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 149520 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 137060 रुपये आहे.

 शहर   22 कॅरेट सोन्याचे दर  24 कॅरेट सोन्याचे दर
दिल्ली 137210 149670
मुंबई 137060 149520
अहमदाबाद 137110 149570
चेन्नई 136690 149120
कोलकाता 137060 149520
हैदराबाद 137060 149520
जयपुर 137210 149670
भोपाळ 137110 149570
लखनऊ 137210 149670
चंडीगड 137210 149670

चांदीच्या दरात घसरण की वाढ ?

सोन्यापाठोपाठ आज चांदी या आणखी एका मौल्यवान धातूच्या किमतीतही वाढ होत आहे. 1 एप्रिलच्या सकाळी, चांदीची किंमत वाढून 2,50,100 रुपये प्रति किलो झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा स्पॉट भाव प्रति औंस 74.64 डॉलर्स आहे. या वर्षी जानेवारीमध्ये चांदीच्या किमतीने 4 लाखांचा टप्पा ओलांडला होता. मात्र आत गेल्या काही महिन्यांत चांदीचे भाव पुन्हा खाली घसरले आहेत.

Follow Us