
तिरुवनंतपुरम: सोन्याचे भाव जसे वाढले तसे सोन्याची तस्करी करण्याचे प्रमाण वाढले आहे. देशातील अनेक आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सोने शरीरात लपवून आणण्याचे प्रमाण वाढले आहे. केरळ विमानतळासह अनेक विमानतळावर सोने तस्करीचे प्रकार घडत आहेत. सीमा शुल्क आणि महसूल संचालनालयाने ( DRI ) रविवारी तिरुवनंतपुरम आणि कोच्ची एअरपोर्टवर तस्करीचे सोने पकडले आहे. तिरुवनंतपुरम एअरपोर्टवर उतरलेल्या एका प्रवाशाकडून ३६० ग्रॅम सोने जप्त केले आहे. तर कोच्चीच्या सीमा शुल्क आयुक्तालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार अधिकाऱ्यांनी सोन्याची तस्करीचे प्रकार विमानतळावर वाढले आहेत. सोन्याच्या वाढत्या किंमतीमुळे सोन्याची तस्करी वाढली आहे.
सीमा शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात तिरुवनंतपुरम एअरपोर्टवर विविध घटनात १.६ कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीच्या प्रयत्नात दोन व्यक्तींनी अटक झाली आहे. तस्करी करणारे आपल्या शरीर वा कपड्यात सोने लपवण्याचे निरनिराळे प्रकार वापरत आहेत. सोन्याला मोती वा माणकांच्या हाराच्या रुपात लपवण्याचा प्रकार उघडकीस आले आहे. सीमाशुल्क विभाग सतर्क असून सोन्याच्या तस्करीवर अंकुश लावण्यासाठी विमानतळांवर तपासणी वाढवण्यात आली आहे. तसेच सोन्याच्या तस्करीला रोखण्यासाठी महसूल संचालनालय देखील सर्तक झाले आहे.
कोच्ची एअरपोर्टवरील एका विमानात बेवारस अवस्थेत ६३० ग्रॅम सोने पडलेले आढळले असल्याचे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सीमा शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार या वर्षी जानेवारी ते जुलै दरम्यान केरळात सोने तस्करीची ८७ केसेस दाखल झाल्या असून त्यात एकूण सुमारे ३२ कोटी रुपयांचे ४०.६ किलोग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरुन घटवून सहा टक्के केल्यानंतर सोन्याच्या तस्करीत घट झाली होती. परंतू सोन्याच्या किंमत प्रचंड वाढल्याने सोन्याची तस्करी पुन्हा वाढली आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की सध्याचे सोन्याच्या किंमतीतील वाढीमुळे सोन्याची तस्करीची प्रकरणे वाढली आहेत. सोन्याच्या दरात घट होताच सोन्याच्या तस्करीचे प्रमाण घटेल असेही हा अधिकारी म्हणाला. मुंबई विमानतळावर तर १२.५८ कोटींच्या सोन्याच्या तस्करीत विमानतळाचे कर्मचारीही सामील झाल्याचे उघडकीस आले होते. तीन कर्मचाऱ्यांसह या प्रकरणात १३ जणांना अटक झाली आहे.