AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहा कोटींची ही कार नव्हे, हा आहे काजू-बदाम खाणारा रेडा…पाहण्यासाठी गर्दीत होणारच

Farmer News | दहा कोटी रुपये किंमत असलेला गोलू याचे खाद्यही वेगळे आहे. त्याला खाद्यात रोज ड्राय फ्रूट म्हणजे काजू-बदाम दिले जाते. 35 किलो चारा, हरबरे, रोज सात ते आठ किलो गुळ, कधी कधी तूप आणि दूधही गोलूला दिले जाते. त्याचे वय सहा वर्ष असले तरी वर्षाला २५ लाखांची कमाई तो करत आहे.

दहा कोटींची ही कार नव्हे, हा आहे काजू-बदाम खाणारा रेडा...पाहण्यासाठी गर्दीत होणारच
| Updated on: Dec 22, 2023 | 9:46 AM
Share

नवी दिल्ली, दि.22 डिसेंबर | एखाद्या कारची किंमत दहा कोटी असेल तर तुम्हाला विश्वास बसेल. परंतु एखाद्या घोड्याची नव्हे तर रेड्याची किंमत दहा कोटी सांगितली तर…तुम्हाला आश्चर्य वाटेल. सध्या दहा कोटींच्या गोलू 2 रेड्याची चर्चा शेतकरी वर्गात नाही तर सर्वसामान्यांमध्येही सुरु आहे. बिहारची राजधानी पटनामध्ये सुरु असलेल्या शेतकरी मेळाव्यात हा रेडा आला आहे. त्याला पाहण्यासाठी चांगली गर्दी होत आहे. दहा कोटी रुपये किंमतीचा हा रेडा महिन्याला 60 हजार रुपयांचा आहार फस्त करतो. काजू-बदामही खातो. हरियाणातील शेतकरी पद्मश्री नरेंद्र सिंह यांचा हा रेडा आहे. या रेड्याचे नाव गोलू 2 आहे. परंतु नरेंद्र सिंह त्याला घोल्लू बोलवतात. नरेंद्र सिंह यांच्या घरात गोलू रेड्याची ही तिसरी पिढी आहे.

वर्षभरात करतो 25 लाखांची कामाई

गोलू 2 रेड्याचे आजोबांचे नाव गोलू होते. त्यानंतर त्याचा मुलगा गोलू 1 नरेंद्रसिंह यांच्या घरात आला. आता गोलू 2 आहे. गोली 2 वर्षभरात २५ लाखांची कामाई करतो. त्याचे वीर्य विकून ही कमाई होते. नरेंद्रसिंह दोन दिवस गोलूसोबत पटण्यात राहणार आहे. गोलू-2 नरेंद्र सिंह हा नरेंद्र सिंह यांचे सर्व इशारे समजतो. गोलूची नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते.

गोलू खोत काजू-बदाम

दहा कोटींचा गोलू याचे खाद्यही वेगळे आहे. त्याला खाद्यात रोज ड्राय फ्रूट म्हणजे काजू-बदाम दिले जातात. 35 किलो चारा, हरबरे, रोज सात ते आठ किलो गुळ, कधी कधी तूप आणि दूधही गोलूला दिले जाते. त्याचे वजन 15 क्विंटल आहे. उंची साडेपाच फूट आहे. रुंदी तीन फूट आहे. गोलू-2 चे वय 6 वर्ष आहे. रेड्यांचे आयुष्य जवळपास वीस वर्ष असते. त्यामुळे नरेंद्र सिंह यांना त्याची अजून चौदा वर्षे त्याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्याच्या जेवणावर महिन्याचा खर्च 60 हजार आहे. गोली यापूर्वी अनेक शेतकरी मेळाव्यात आला आहे. त्याला पाहण्यासाठी सर्वच मेळाव्यात गर्दी होत असते. गोली सोबत अनेक जण फोटो आणि सेल्फीही काढत असतात.

महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा
महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा.
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.