शेतकर्‍यांसाठी आनंदवार्ता, खरीप पिकांवरील MSP मध्ये वाढ, मोदी कॅबिनेटचे 5 मोठे निर्णय काय?

Modi Cabinet Decisions : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता आणली आहे. मोदी सरकारने 2025-26 या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या 14 पिक उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.

शेतकर्‍यांसाठी आनंदवार्ता, खरीप पिकांवरील MSP मध्ये वाढ, मोदी कॅबिनेटचे 5 मोठे निर्णय काय?
मोदी कॅबिनेट बैठक
Image Credit source: टीव्ही 9 नेटवर्क
| Updated on: May 28, 2025 | 4:51 PM

आज मोदी कॅबिनेटची बैठक झाली. दिल्लीत झालेल्या या बैठकीत शेतकर्‍यांसाठी मोठी आनंदवार्ता आली. केंद्र 2025-26 या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या 14 पिक उत्पादक शेतकर्‍यांना मोठा फायदा होईल. त्यांच्या पिकाला दाम मिळेल. त्यांचे नुकसान टळेल. यासोबतच इतरही चांगले निर्णय मोदी सरकारने घेतले आहे.

खरीप पिकाच्या MSP मध्ये वाढ

मोदी सरकारने आज 2025-26 विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे बाजार भावापेक्षा शेतकर्‍यांना चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या शेतकी उत्पादनाला, मालाला चांगला भाव मिळण्याची एकप्रकारे हमी देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

2025-26 साठी खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ करण्याचा निर्णय मोदी कॅबिनेटने आज जाहीर केला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने 14 खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ करण्यास मंजूरी दिली आहे. या निर्णयामुळे शेतकर्‍यांना कृषी मालासाठी चांगला दर मिळण्याची शक्यता आहे.

या पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, केंद्र सरकारने विपणन हंगाम 2025-26 या खरीप हंगामासाठी पिकांच्या आधारभूत किंमतीत वाढ केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विचार करता, एमएसपीमध्ये सर्वाधिक वाढ नायजर बियाण्यांसाठी (प्रति क्विंटल 820 रुपये), त्यानंतर रागी (प्रति क्विंटल 596 रुपये), कापसासाठी (प्रति क्विंटल 589 रुपये) आणि तिळासाठी (प्रति क्विंटल 579 रुपये) झाली आहे.

खरीप पिकाच्या MSP मध्ये वाढ

खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्यास मंजूरी देण्यात आली. त्यानुसार, 2025-26 या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ ही 2018-19 मधील केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेशी सुसंगत आहे. त्यामध्ये अखिल भारतीय सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट किमान आधारभूत किमत निश्चितीबाबत चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा सर्वाधिक नफा बाजरी, मका, तूर आणि उडदावर मिळण्याची अपेक्षा आहे. तर उर्वरीत पिकांवर सुद्धा 50 टक्के फायदा होण्याची शक्यता आहे.