Good News ! ट्रेन तिकट कन्फर्म होईल की नाही, आता इतक्या तासांपूर्वी मिळणार माहिती, प्रवाशांची फजिती टळणार

Indian Railways Waiting List Chart : आता आरक्षित तिकिटाच्या प्रतिक्षा यादी चार्टबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आता वेटिंग लिस्टचा चार्ट प्रवाशांना 4 तास नाही तर इतक्या तास अगोदर मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन अगोदरच करता येणार आहे.

Good News ! ट्रेन तिकट कन्फर्म होईल की नाही, आता इतक्या तासांपूर्वी मिळणार माहिती, प्रवाशांची फजिती टळणार
भारतीय रेल्वेचे मोठे पाऊल
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 11, 2025 | 11:34 AM

भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी अजून एक मोठे पाऊल टाकले आहे. आता आरक्षित तिकिटाची प्रतिक्षा यादी तक्ता लवकर समोर येणार आहे. वेटिंग लिस्ट चार्च प्रवाशांना 4 तास नाही तर त्यापेक्षा पण अगोदर मिळणार आहे. प्रवाशांना आता 24 तासांपूर्वीच ही यादी मिळेल. त्यामुळे त्यांना प्रवासाचे नियोजन अगोदरच करता येईल. रेल्वे प्रवासाचा कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना नाहक त्रास होणार नाही. तर त्यांना आता 24 तास अगोदरच त्यांच्या प्रवासाचे धोरण आखता येईल.

6 जूनपासून सुरू झाला प्रयोग

कन्फर्म तिकीट यादी आणि त्याविषयीचा तक्ता अगोदरच जाहीर होणार आहे. याविषयीचे पाऊल या 6 जून रोजी टाकण्यात आले आहे. बिकानेर भागातील ट्रेन प्रवासासाठी हा प्रयोग राबवण्यात आला आहे. रेल्वेच्या सूत्रांनुसार सुरुवातीच्या चार दिवसांत या प्रयोगाचे सकारात्मक परिणाम दिसून आले. प्रवाशांना पूर्वीच माहिती मिळते की त्यांचे तिकिट कन्फर्म आहे की नाही. त्यामुळे जर तिकीट कन्फर्म नसेल तर ते दुसर्‍या साधनांचा वापर करण्यास मोकळे होतात. ते त्यांच्या प्रवासाचे नियोजन करू शकतात. या प्रयोगामुळे त्यांची वेळेवर होणारी फटफजिती टळणार आहे.

गर्दीच्या मार्गावर ठरणार अधिक परिणामकारक

बिकानेरमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्याने देशातील इतर गर्दीच्या मार्गिकेवर हा प्रयोग लागू करण्यात येणार आहे. रेल्वे वाहतुकीचे जे मार्ग अधिक गर्दीचे आहे. तिथे हा प्रयोग राबण्यात येईल. यामध्ये दिल्ली ते उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि गुजरात सारख्या अनेक राज्यांतील रेल्वे मार्गांचा समावेश आहे. या राज्यातील अनेक मार्गांवर रेल्वे प्रवाशांना प्रतिक्षा यादीची समस्या, अडचण नेहमी भेडसावते. त्यांचे तिकीट वेळेवर कन्फर्म होत नाही. त्यामुळे त्यांना प्रवासात अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. हा प्रवास नरका सारखा होतो.

हा उपाय पण करणार

कन्फर्म तिकिटाची यादी तयार करण्यासोबतच अजून एक प्रयोग करण्याचा रेल्वे विभागाचा मानस आहे. त्यानुसार, जर 24 तासांपूर्वी प्रतिक्षा यादी तयार होत असेल आणि प्रवाशांचा आकडा अधिक असेल तर स्थानिक प्रशासन त्या रेल्वेला अतिरिक्त डब्बा जोडू शकतात. याविषयीचा प्रस्ताव रेल्वे मंत्र्यांसमोर अधिकाऱ्यांनी सादर केला होता. त्याला त्यांनी तात्काळ मंजूरी दिली. त्यामुळे प्रवाशांना जागा उपलब्ध होण्याचा मार्ग पण मोकळा झाला आहे.