सावधान! आता गुगलवरुनही बँकिंग फ्रॉड

नवी दिल्ली : ऑनलाईन बँकिंग फ्रॉडचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ऑनलाईन बँकिंग सुरक्षित असल्याचं सांगितलं जातं, पण ऑनलाईन फसवणुकीची अनेक प्रकरणं दररोज समोर येत असतात. त्यातच आता गुगल मॅप्सच्या माध्यमातूनही बँकिंग फ्रॉड होत असल्याचं समोर आलं आहे. गुगलच्या काही त्रुटींचा फायदा घेत या प्रकारच्या फसवणुकी केल्या जातात. गुगल सर्च आणि गुगल मॅप्सवरुन बँकिंग फसवणूक होणे खरंच …

, सावधान! आता गुगलवरुनही बँकिंग फ्रॉड

नवी दिल्ली : ऑनलाईन बँकिंग फ्रॉडचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ऑनलाईन बँकिंग सुरक्षित असल्याचं सांगितलं जातं, पण ऑनलाईन फसवणुकीची अनेक प्रकरणं दररोज समोर येत असतात. त्यातच आता गुगल मॅप्सच्या माध्यमातूनही बँकिंग फ्रॉड होत असल्याचं समोर आलं आहे. गुगलच्या काही त्रुटींचा फायदा घेत या प्रकारच्या फसवणुकी केल्या जातात. गुगल सर्च आणि गुगल मॅप्सवरुन बँकिंग फसवणूक होणे खरंच धक्कादायक आहे, त्यामुळे गुगलवर विश्वास ठेवायचा की नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

कशी होते फसवणूक?

गुगलच्या यूझर जनरेटेड कंटेंट पॉलिसीअंतर्गत कुणीही गुगल मॅप्सच्या पेजवरील माहिती एडीट करु शकतो. यामध्ये फोन नंबर आणि पत्ता या माहितीचाही समावेश असतो.

लोकांची फसवणूक करण्यासाठी हे स्कॅमर्स गुगल मॅप आणि गुगल सर्च कंटेंटवरील बँकेची माहिती एडीट करून चुकीची माहिती म्हणजेच चुकीचा फोन नंबर आणि पत्ता टाकतात.

गुगलवर जे काही दाखवण्यात येतं ते सर्व खरं असतं, असा आपला समज आहे. याचाच फायदा स्कॅमर्सला होतो. गुगलवर दिलेला बँकेचा नंबर हा विश्वासार्ह असल्याचं समजत आपण त्यावर कॉल करतो. कॉल उचलणारी व्यक्तीही बँकेची कर्मचारी असल्याप्रमाणे बोलते. त्यामुळे समोरील व्यक्ती ही फ्रॉड असल्याचं आपल्याला कळत नाही. त्यानंतर समोरील व्यक्ती आपल्याला आपल्या बँक खात्यासंबधी जी काही माहिती मागेल ती आपण सांगतो. एकदा माहिती मिळाली की बँक खात्यातून पैसे काढण्याचे अनेक पर्याय असतात. ज्याचा वापर करून हे स्कॅमर्स आपली फसवणूक करतात.

गुगलने अशाप्रकारचे फ्रॉड होत असल्याचे मान्य केले, पण माहिती एडीट करण्याचा पर्याय अजूनही हटविण्यात आलेला नाही.

‘द हिंदू’च्या रिपोर्टनुसार, महाराष्ट्र स्टेट सायबर पोलीसचे एसबी बालसिंग राजपूत यांनी सांगितले की, “आम्हाला या संबंधीत तीन तक्रारी आल्या, ज्या बँक ऑफ इंडियाच्या आहेत. या विषयी आम्ही गुगलला कळवले आहे”.

ग्राहक गुगलवर बँक काँटॅक्ट डिटेल्स सर्च करतात आणि त्यावर दिलेल्या नंबरवर कॉल करतात. कधीकधी हे नंबर चुकीचे असतात. पण ग्राहकांना याची माहिती नसते. त्यामुळे ते फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीला बँकेचा कर्मचारी समजून आपल्या खात्याची गोपनीय माहिती देतात. यामध्ये सीव्हीव्ही नंबर आणि पिन यांचाही समावेश असतो. ज्यानंतर तुमच्या खात्यातून पैसे काढले जातात आणि तेव्हा तुम्हाला फ्रॉड झल्याचे समजते.

बँकेकडून वारंवार हे सांगितल्या जातं की आपल्या बँक खात्या संबधी माहिती, जसे की, खाते क्रमांक, कार्ड क्रमांक, सीव्हीव्ही क्रमांक, पिन कुणासोबत शेअर करू नये. तसेच बँक कधीही आपल्याला आपले सीव्हीव्ही क्रमांक किंवा पिन विचारत नाही, असेही सांगितले जाते. रोज मोबाईलवर त्यासंबंधीचे जागरूकता पसरविणारे मेसेज येत असतात. तरीही आपण अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडतो.

त्यामुळे कधीही आपला पिन, सीव्हीव्ही क्रमांक, कार्ड क्रमांक कुणाला सांगू नका. बँक काँटॅक्ट डिटेल्स आपल्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून घ्या. त्यासाठी गुगलवर अवलंबून राहू नका. बँकेसंबधी ऑनलाईन व्यवहार करताना किंवा कस्टमर केअरशी बोलताना सावधानता बाळगा.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *