Gorakhnath Temple Attack : आयआयटी मुंबईतून शिक्षण, नवी मुंबईत वास्तव्य, पेट्रोकेमिकल्स कंपन्यात नोकरी, कोण आहे अब्बासी मुर्तझा

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील (Gorakhpur) गोरखनाथ मंदिर (Gorakhnath Temple) परिसरात रविवारी सुरक्षा रक्षकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुर्तझा अब्बासी (Murtaza Abbasi) असं हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. उत्तर प्रदेश पोलिसांचं एक पथक कालचं महाराष्ट्रात दाखल झालं असून त्यांनी नवी मुंबईत चौकशी सुरु केलीय.

Gorakhnath Temple Attack : आयआयटी मुंबईतून शिक्षण, नवी मुंबईत वास्तव्य, पेट्रोकेमिकल्स कंपन्यात नोकरी, कोण आहे अब्बासी मुर्तझा
Murtaza AbbasiImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 12:16 PM

लखनौ : उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील (Gorakhpur) गोरखनाथ मंदिर (Gorakhnath Temple) परिसरात रविवारी सुरक्षा रक्षकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुर्तझा अब्बासी (Murtaza Abbasi) असं हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. उत्तर प्रदेश पोलिसांचं एक पथक कालचं महाराष्ट्रात दाखल झालं असून त्यांनी नवी मुंबईत चौकशी सुरु केलीय. मुर्तझाचं महाराष्ट्र कनेक्शन पोलीस तपासात समोर आलं आहे. अब्बासी मुर्तझा हा मूळचा गोरखपूरमधील आहे. मुर्तझानं आयआयटी बॉम्बेमधून शिक्षण पूर्ण केलंय. नवी मुंबईतील उच्चभ्रू ठिकाण सानपाडा मध्ये तो 8 वर्ष वास्तव्यास होता. यापूर्वी त्यानं दोन पेट्रोकेमिकल्स कंपन्यांमध्ये काम केलं होतं. कोरोनामध्ये त्यानं नोकरी गमावली. मुर्तझाला त्याची पत्नी देखील सोडून गेली होती.

मुर्तझा अब्बासी मूळचा गोरखपूरचा महाराष्ट्रात शिक्षण

मुर्तझा अब्बासी हा मूळचा उत्तर प्रदेशमधील आहे. योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ असलेल्या गोरखपूरमधील असून त्यानं उच्च शिक्षण मुंबईतून पूर्ण केलं आहे. शिक्षण पूर्ण होण्याच्या काळात तो नवी मुंबईत वास्तव्यास होता.

आयआयटी मुंबईत शिक्षण

मुर्तझा अब्बासीच्या आधारकार्डवर नवी मुंबईतील पत्ता आढळून आला आहे. मुर्तझा अब्बासी हा आयआयटी बॉम्बेमध्ये शिकलेला आहे. त्यानं केमिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

दोन मोठ्या कंपन्यांमध्ये काम

अब्बासी मुर्तझा यानं आयआयटी मुंबईतून केमिकल इंजिनिअरींग पूर्ण केल्यानंतर दोन मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी केली आहे. देशातील दोन मोठ्या पेट्रोकेमिकल कंपन्यांमध्ये तो काम करत होता. अब्बासी मुर्तझा याला कोरोना काळात नोकरी गमवावी लागली होती. तर, अब्बासी मुर्तझायाला त्याची बायको सोडून गेली होती.

मानसिक आजारावरील उपचार सुरु

मुर्तझा अब्बासी याची मानसिक स्थिती ठीक नसल्यानं त्याच्यावर उपचार सुरु होते. अहमदाबाद आणि इतर शहरांमध्ये उपचार करण्यात येत होते. 2017 पासून मुर्तझा अब्बासीवर मानसिक स्थिती योग्य नसल्यानं उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून मित्रांच्या संपर्कात देखील मुर्तझा नसल्याची माहिती आहे.

हल्ला करण्यापूर्वी मुर्तझा मुंबईत

मुर्तझा अब्बास यानं हल्ला गोरखनाथ मंदिर परिरसरात करण्यापूर्वी तो काही काळ मुंबईत होता असं समोर आलं आहे. मुर्तझा गोरखपूरला मुंबईहून आला होता. मुर्तझाकडे इंडिगो एअरलाईन्सचं तिकीटदेखील मिळाले आहे.

इतर बातम्या :

Gorakhnath Temple Attack : गोरखनाथ मंदिर हल्ल्यातील अब्बासी मुर्तझाचं नवी मुंबई कनेक्शन, यूपी पोलिसांचं पथक चौकशीसाठी महाराष्ट्रात

Gorakhnath Temple Attack : गोरखनाथ मंदिर हल्ल्यातील अब्बासी मुर्तझाच्या आयएस कनेक्शनचा संशय, लॅपटॉपमधून व्हिडीओ नकाशा यंत्रणांच्या हाती

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.