AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारची गुगल प्ले स्टोअरला नोटीस, ते 7 अ‍ॅप हटवण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

काही चिनी अ‍ॅपचा वापर करून रस्त्यावरच ई-रिक्षा थांबवल्या जात असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता सरकारने मोठं पाऊल उचललं आहे.

सरकारची गुगल  प्ले स्टोअरला नोटीस, ते 7 अ‍ॅप हटवण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
सरकारची गुगल प्ले स्टोअरला नोटीस Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 03, 2026 | 8:29 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं होतं. मध्यपूर्वेतून होणारा कच्च्या तेलाचा साठा जवळपास ठप्पच झाला होता. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती देखील चांगल्याच वाढल्या होत्या. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात देखील वाढ करण्यात आल्याचं पहायला मिळालं. दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेलचे दर वाढतच चालले आहेत, त्याची मोठी आर्थिक झळ ही वाहनधारकांना बसत असल्यामुळे आता अनेकांनी आपला मोर्चा हा इलेक्ट्रिक व्हेकलकडे वळवला आहे. 2025 च्या तुलनेत 2026 मध्ये देशात इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या वाढली आहे. सरकारकडून देखील इलेक्ट्रिक वाहनाच्या खरेदीसाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. इलेक्ट्रिक वाहनाचे अनेक फायदे आहेत, एक तर या वाहनांमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होतं, दुसरी गोष्ट म्हणजे पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीची झळ देखील बसत नाही. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक व्हेकलसोबत एक विचित्र प्रकार घडताना दिसत आहे, त्यामुळे ईव्ही मालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

काही चिनी अ‍ॅपचा वापर करून रस्त्यावरच ई-रिक्षा थांबवल्या जात असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशा पद्धतीने एखादं इलेक्ट्रिक वाहन रस्त्यावरच अचानक बंद पडल्यामुळे त्या भागात वाहतूक कोंडीची देखील समस्या निर्माण होत आहे.काही मोबाईल अ‍ॅप्स आणि ब्लूटूथद्वारे ईव्ही वाहनाची बॅटरी सिस्टम बंद करून ही वाहनं थांबली जात असल्याचा आरोप देखील केला जात आहे.

BAT-BMS सारख्या अ‍ॅप्समधून इलेक्ट्रिक वाहन बंद केले जात असल्याचा आरोप होत आहे. हे अ‍ॅप शेन्झेन ग्रेनर्जी टेक्नॉलॉजी या चीनी कंपनीने विकसित केलेले बॅटरी व्यवस्थापन प्रणाली ॲप आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीवर देखरेख ठेवण्याचा हेतू या अ‍ॅपचा आहे. दरम्यान या पार्श्ववभूमीवर आता सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ई-रिक्षा किंवा वाहनांमधील बॅटरी बंद करण्यासाठी ॲप्सचा गैरवापर केल्याप्रकरणी, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गुगल अँड्रॉइड आणि अ‍ॅपल आयओएसला त्यांच्या अ‍ॅप स्टोअरवरून 7 ॲप्लिकेशन्स काढून टाकण्याची नोटीस बजावली आहे. यात BAT-BMS, SMART BMS आणि LOSSIGY यांसारख्या काही अ‍ॅप्सचा समावेश आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ