IndiavsPakistan: पाकिस्तानच मोठं नुकसान झाल्याची कबुली, जगाकडे भीक मागितली

IndiavsPakistan: पाकिस्तानच्या आर्थिक विभागाकडून नुकसान झाल्याची कबुली, शत्रू राष्ट्राने जगाकडे भीक मागितली... भारताकडून सतत होणाऱ्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचं मोठं नुकसान...

IndiavsPakistan: पाकिस्तानच मोठं नुकसान झाल्याची कबुली, जगाकडे भीक मागितली
India vs Pakistan new
| Updated on: May 09, 2025 | 10:28 AM

IndiavsPakistan: पाकिस्तानने जगातील अनेत देशांकडे भीक मागण्यास सुरुवात केली आहे. भारताच्या कारवाईनंतर पाककडून इतर देशांकडे भीक मागण्यास सुरुवात केली आहे. एक ट्विट करत पाकिस्तानने इतर देशांकडून भीक मागितली आहे. पाकिस्तानच्या आर्थिक विभागाने ट्विट केलं आहे. सध्या पाकिस्तानच्या आर्थिक विभागाकडून करण्यात आलेलं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाकिस्तान सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाने ट्विट केलं आहे. ‘शत्रूकडून झालेल्या मोठ्या नुकसानानंतर पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय देशांकडे अधिक कर्जासाठी आवाहन केले आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय सहकार्यांना  मदत करण्याचं आवाहन करतो. असं ट्विट पाकिस्तानकडून करण्यात आलं आहे.

 

भारताने आमचं प्रचंड नुकसान केलं आहे, त्यामुळे आम्हाला आगाऊ कर्ज देण्याची मागणी पाकिस्तानने जगाकडे केलं आहे. आमचं स्टॉक मार्केट कोसळलं आहे आणि आम्ही अत्यंत कठीण प्रसंगाचा सामना करत आहोत त्यामुळे आमच्या अंतरराष्ट्रीय सहकार्यांनी मदतीसाठी पुढे यावं… असं ट्विट पाकिस्तानकडून करण्यात आलं आहे.

पाकिस्तानने 22 एप्रिल रोजी पहलगाम याठिकाणी पर्यटकांना त्यांच्या धर्म विचारत त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये 26 जणांनी आपले प्राण गमावले तर, अनेक जण जखणी झाले. याचाच बदला घेत 7 मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानचा बदला घेतला. ऑपरेशन सिंदूरमध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर येत आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे गोंधळून गेलेल्या पाकिस्तानने बुधवारी आणि गुरुवारी रात्री जम्मू, पंजाब, राजस्थान, गुजरातमधील सीमेलगतच्या भागांतील भारतीय लष्कराच्या आस्थापनांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यामुळे पाकिस्तान भीकेला लागला आहे. यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थितीत आहे.