तुम्हालाही आलाय ‘हा’ मेसेज, तर सावधान! तुमचे पैसे चोरीला जाऊ शकतात, गृह मंत्रालयाचा इशारा

गेल्या काही महिन्यांमध्ये सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सायबर क्राईमला आळा घालणं हे एक मोठं आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे (Government warn about cyber crime).

तुम्हालाही आलाय 'हा' मेसेज, तर सावधान! तुमचे पैसे चोरीला जाऊ शकतात, गृह मंत्रालयाचा इशारा
जर आपल्या खात्यातून पैसे चोरले तर तात्काळ या क्रमांकावर करा कॉल, काही मिनिटांतच होईल कारवाई
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 5:17 PM

मुंबई : नेट बँकिंगकडे लोकांचा सध्या जास्त कल आहे. गुगल पे, फोन पे, भीम अ‍ॅप असे वेगवेगळे माध्यमं उपलब्ध असल्याने सर्वसामान्य नागरिकही आता स्वत:हून ऑनलाईन बँकिंगच्या दिशेला वळत आहेत. बँकेत किंवा एटीएमबाहेर लांब रांगेत उभं राहण्यापेक्षा ऑनलाईन व्यवहार करणं हे सोपं आणि सोयीस्कर आहे. याशिवाय यामुळे वेळेची बचतही होते. मात्र, या नव्या माध्यमांसोबत आणखी काही नवी आव्हानं देखील उभी राहिली आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सायबर क्राईमला आळा घालणं हे एक मोठं आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे (Government warn about cyber crime).

सायबर क्राईमच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने महत्त्वपूर्ण माहिती ट्विटरवर जारी केली आहे. ट्विटरवर ‘सायबर दोस्त’ या केंद्र सरकारच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. सायबर गुन्हेगार लोकांना मेसेज करुन अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. सायबर गुन्हेगारांच्या भूलथापांना बळी पडून अनेक लोक यामध्ये बळी ठरले आहेत. अनेकांना यामुळे लुबाडलं गेलं आहे. सायबर क्राईमच्या अशा विविध घटना समोर आल्यानंतर केंद्र सरकारने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे (Government warn about cyber crime).

सायबर गुन्हेगार नेमका काय मेसेज पाठवतात?

सायबर गुन्हेगार लोकांना मेसेज पाठवत आहेत. या मेसेजमध्ये ते एक लिंकदेखील पाठवतात. या लिंकवर चुकूनही क्लिक केलं तर युजर्सचं मोठं नुकसान होत आहे. “तुमचं बँक खातं नॉमिनीसोबत जोडलं गेलं आहे. तुम्ही पुढच्या 30 मिनिटात नॉमिनीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करु शकतात. जर तुम्ही तसं केलं नसेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तक्रार दाखल करु शकतात”, असं मेसेजमध्ये लिहिलेलं असतं.

ठळक बातम्या, बेधडक विश्लेषण, पाहा 8 PM स्पेशल रिपोर्ट, टीव्ही 9 मराठीवर

मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर हॅकर्स युजर्सची सर्व वैयक्तिक माहिती चोरु शकतो. अनेकदा काही युजर्स कोणताही विचार न करता लिंकवर क्लिक करतात. त्यामुळे युजर्सच्या खात्यांमधून पैसे देखील चोरीला जाऊ शकतात. यासारख्या सायबर क्राईमच्या घटनांमुळे गृहमंत्रालयाने गाईडलाईन्स जारी करत लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. अशा प्रकारचा कोणताही मेसेज किंवा लिंक मेसेजद्वारे आली तर तातडीने सायबर पोलिसांना याबाबत माहिती द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

सायबर क्राईमपासून कसं वाचावं?

सायबर क्राईमपासून बचावासाठी आपण सतर्क राहणं गरजेचं आहे. कोणताही संशयित मेसेज आला तर त्याबाबत सायबर पोलिसांना माहिती द्यावी. हॅकर्सकडून दिशाभूल करणारे मेसेज पाठवले जातात. या मेसेजच्या बळी पडू नये, सतर्क राहावं. मेसेजमध्ये आलेल्या लिंकवर घाईगडबडीत क्लिक करु नये. अन्यथा युजर्सची वैयक्तिक माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचते. संबंधित मेसेज नेंमका कुठून आला आहे, याची शाहनिशा करुनच लिंकवर क्लिक करावं.

हेही वाचा : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही, शरद पवारांची आजही रोखठोक भूमिका

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.