AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजून एका बाबाचे मोठे कांड! आश्रमातच थाटला नकली नोटांचा कारखाना, पोलीस ही थकले बंडलं मोजताना

Fake Currency: नाशिकमधील अशोक खरात या भोंदूबाबाचे प्रकरण ताजे असतानाच आता अजून एका बाबाचे कांड समोर आले आहे. याबाबाने आश्रमातच नकली नोटा छापण्याचा कारखाना सुरू केला होता. पोलिसांनी या ठिकाणाहून कोट्यवधींच्या नोटा जप्त केल्या आहेत.

अजून एका बाबाचे मोठे कांड! आश्रमातच थाटला नकली नोटांचा कारखाना, पोलीस ही थकले बंडलं मोजताना
गुजरात खोट्या नोटा रॅकेटImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 20, 2026 | 4:11 PM
Share

Gujrat Fake Currency: नाशिकमधील ज्योतिषी आणि भोंदूगिरी करणारा अशोक खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप लागले आहेत. त्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तर गुजरातमध्ये एका बाबाने अजून एक कांड केले आहे. अहमदाबाद गुन्हे शाखेने सुरत येथे नकली नोटा छापणाऱ्या आश्रमाचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या आश्रमातून 2 कोटी रुपयांहून अधिकच्या नोटा जप्त केल्या आहेत. सुरत जवळील कामरेज तालुका आहे. येथील पारडी गावात ‘श्री सत्य योग फाउंडेशन’ या आश्रमात हे असत्याचे प्रयोग सुरू होते. बाहेरून धर्माचे पांघरूण घेऊन आत नकली नोटांचा गोरखधंदा सुरू होता. देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचे पाप या आश्रमातून सुरू होते.

40 हजारांहून अधिक नकली नोटा जप्त

गुन्हे शाखेला एक गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, सुरत येथून नकली नोटांची एक मोठी खेप अहमदाबाद येथे आणण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. पोलिसांनी गुप्त माहिती आधारे अमराईवाडी परिसरात नाकाबंदी केली होती. तिथे काही महिला आणि 6 पुरुषांच्या संशयास्पद हालचालींनी पोलीस सतर्क झाले. त्यांना अटक करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडून 500 रुपयांच्या 40 हजारांहून अधिक नकली नोटा हस्तगत करण्यात आल्या. या नोटांची एकूण किंमत जवळपास 2 कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे.

500 रुपये द्या आणि तीनपट अधिक नोटा मिळवा

या नोटा सुरत येथील वराछा या परिसरात छापल्याचे समोर आले. या नोटा बाजारात चालवण्यासाठी खास योजना आखण्यात आली होती. त्यानुसार खरी 500 रुपयांची नोट द्या आणि 1500 रुपयांच्या नकली नोटा मिळवा अशी स्कीम होती. या भामट्यांनी 66 लाख खऱ्या नोटांच्या बदल्यात 2 कोटी रुपयांच्या खोट्या नोटा बाजारात आणण्याची योजना आखली होती. पण त्यापूर्वीच त्यांचा भांडाफोड झाला.

आश्रमात नोटांचा छापखाना

पोलिसांनी संबंधित आश्रमात छापा टाकला. तिथे प्रिंटिंग मशीन, संगणक, खास कागद, रंग आणि काही महत्त्वाची कागदपत्रं त्यांच्या हाती लागली. आश्रमातील वाहनांचा वापरही या नकली नोटांच्या रॅकेटसाठी करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. पंचनामा दरम्यान पोलिसांनी 40 हजारांहून अधिक नकली नोटा जप्त केल्या. या नकली नोटांचे रॅकेटचे देशभरात कनेक्शन असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्यासाठी तपासाची व्याप्ती वाढवली आहे.

Follow Us
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर