AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्ञानवापी प्रकरणी सर्वेक्षणाला स्थगिती, खोदकामावर बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

उत्तर प्रदेशातील वाराणासीतील ज्ञानवापी मशीद प्रकरणी एसआयच्या सर्व्हेवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या मुस्लिम पक्षकारांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

ज्ञानवापी प्रकरणी सर्वेक्षणाला स्थगिती, खोदकामावर बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
| Updated on: Jul 24, 2023 | 12:21 PM
Share

नवी दिल्ली | 24 जुलै 2023 : उत्तर प्रदेशातील वाराणासीतील ज्ञानवापी मशीद प्रकरणी एसआयच्या सर्व्हेवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या मुस्लिम पक्षकारांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ज्ञानवापीतील सर्व्हेक्षणावर दोन दिवसाची स्थगिती देण्यात आली आहे. तसेच मशीद परिसरात आठवडाभर खोदकाम करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. या प्रकरणाचा सर्वे अहवाल 4 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे या सर्व्हे अहवालानंतर कोर्ट काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ज्ञानवापी मशिदीत आज सर्व्हे सुरू होणार होता. सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली आहे. ही स्थगिती 26 जुलैच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असेल. हा सर्व्हे भारतीय पुरातत्व विभाग (एएसआय)द्वारे केला जाणार होता. 40 जणांची टीम हा सर्व्हे करत होती. वजूखाना सोडून इतर भागातील प्रत्येक ठिकाणी सर्व्हे करण्याचा आदेश देण्यात आला होता. वाराणासी जिल्हा न्यायालायने हा निर्णय दिला होता. एएसआयला 4 ऑगस्ट रोजी सर्व्हे रिपोर्ट न्यायालयात सादर करायचा आहे. सर्व्हेच्या पार्श्वभूमीवर मशीद परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश

मुस्लिम पक्षकारांनी या सर्व्हेला स्थगिती देण्याची मागणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर स्थगिती दिली. तसेच कालच मुस्लिम पक्षकारांना उच्च न्यायलयात जाण्यास सांगितलं होतं. सर्वोच्च न्यायालायने अंतरीम आदेश दिला असला तरी त्याचा उच्च न्यायालयाच्या सुनावणीवर काहीच परिणाम होणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

आज कोर्टात काय घडलं?

जिल्हा न्यायालयाचा आदेश मानून पुरातत्व विभागाची टीम सर्व्हे करण्यासाठी ज्ञानवापी मशिद परिसरात गेली होती. या सर्व्हेसाठी चार पथके तयार करण्यात आले होते. चारही टीम वेगवेगळ्या ठिकाणी सर्व्हे करण्यासाठी गेल्या होत्या. एक टीम पश्चिमेकडील भिंतीकडे, दुसरी घुमटाकडे, तिसरी चबुतऱ्याकडे आणि चौथी मशीद परिसरात गेली होती.

त्यामुळे मुस्लिम पक्षकार सर्वोच्च न्यायालयात आले. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी पुरातत्व विभागाला आपली भूमिका मांडण्यास सांगितलं. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसासाठी सर्व्हे करण्यास बंदी घातली आहे. तसेच मशीद परिसरात खोदकाम करण्यासही मनाई केली आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान