AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hamas : इस्रायलशी लढता, लढता ‘हमास’ भारताच्या उंबरठ्यावर, उगाचच डिवचण्याचा प्रयत्न

Hamas : इस्रायलशी लढता, लढता 'हमास' भारताच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली आहे. हमासने उगाचच भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. इस्रायलने भारताला याबद्दल गांभीर्याने विचार करण्याच अपील केलय. पाकिस्तानच समर्थन असलेल्या दहशतवादी संघटनांसोबत हमासची हातमिळवणी चिंताजनक असल्याच इस्रायलने स्पष्टपणे म्हटलं आहे.

Hamas : इस्रायलशी लढता, लढता 'हमास' भारताच्या उंबरठ्यावर, उगाचच डिवचण्याचा प्रयत्न
Israel-Hamas
| Updated on: Mar 04, 2025 | 1:44 PM
Share

पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या रावळकोटमध्ये 5 फेब्रुवारीला एक कार्यक्रम झाला. ‘कश्मीर सॉलिडेरिटी आणि हमास ऑपरेशन’ ‘अल अक्सा फ्लड’ कॉन्फ्रेंस’ असं या कार्यक्रमाच नाव होतं. या इवेंटमध्ये हमास नेते डॉ. खालिद अल-कदूमी सहभागी झालेले. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्यासोबत या मंचावर पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि लश्कर-ए-तैयबाचे दहशतवादी सुद्धा होते. POK मध्ये आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात हमास नेत्याने सहभागी होण्याची ही पहिली वेळ आहे. या कार्यक्रमात दहशतवाद्यांनी फक्त भारताविरोधात भाषणच केली नाहीत, तर हमासचे झेंडे फडकवत मोटरसायकल आणि घोड्यांवर बसून शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं.

हमास नेत्याच्या POK मधील उपस्थितीनंतर इस्रायलने भारताला याबद्दल गांभीर्याने विचार करण्याच अपील केलय. पाकिस्तानच समर्थन असलेल्या दहशतवादी संघटनांसोबत हमासची हातमिळवणी चिंताजनक असल्याच इस्रायलने स्पष्टपणे म्हटलं आहे. भारताने हमासचा दहशतवादी संघटनांमध्ये समावेश करावा अशी मागणी इस्रायलने केली आहे. भारताने अजूनपर्यंत हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेलं नाही. भारतीय कायद्याच्या UAPA अंतर्गत आतापर्यंत 44 संघटनांना दहशतवादी घोषित करण्यात आलं आहे. पण यात हमासच नाव नाहीय.

इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला

अमेरिकेने 1997 साली त्यानंतर यूरोपियन युनियन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन या देशांनी हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलय. रशिया, चीन आणि टर्की सारख्या देशांनी अजून हमासला दहशतवादी संघटना ठरवलेलं नाही. 7 ऑक्टोंबर 2023 रोजी हमासने इस्रायलमध्ये भीषण दहशतवादी हल्ला केला. इस्रायलच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो. त्यानंतर गाजा युद्धाची सुरुवात झाली. यात हजारो लोकांनी आपले प्राण गमावले.

भारत-इस्रायल संबंध बळकट

भारत आणि इस्रायलने मागच्या काही वर्षात आपले संबंध मजबूत बनवले आहेत. खासकरुन संरक्षण क्षेत्रात दोघांचा ताळमेळ खूप चांगला आहे. 2002 मध्ये स्थापन झालेली “भारत-इस्रायल जॉइंट वर्किंग ग्रुप ऑन काउंटर-टेररिज्म”ची दरवर्षी बैठक होते. यात सीमा सुरक्षा, दहशतवादी फंडिंग आणि सायबर सुरक्षा सारख्या मुद्यांवर चर्चा होते.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?