AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? सरकारने अखेर सस्पेन्स संपवला, थेट सांगूनच टाकलं; सध्या…

सध्याची इंधन टंचाई आणि भारताची स्थिती लक्षात घेता लवकरच भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार आहे, असा अनेकजण दावा करत आहेत. यावरच आता मोदींच्या मंत्रिमंडळातील एका बड्या मंत्र्याने सविस्तर माहिती दिली आहे.

देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? सरकारने अखेर सस्पेन्स संपवला, थेट सांगूनच टाकलं; सध्या...
lockdown in indiaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 12, 2026 | 5:56 PM
Share

Lockdown In India : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे सध्या जगात मोठे उर्जासंकट निर्माण झाले आहे. भारतातीही इंधनाची मोठी कमतरता भासत आहे. भारतात पेट्रोल, डिझेलची किंमत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे गॅस सिलिंडरची किंमतही वाढली आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोने खरेदी करू नका, असे आवाहन केले आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे काटकसरीने वागायला सांगितले आहे. या सर्व घडामोडींमुळे भविष्यात देशाची परिस्थिती आणखी बिकट होणार का, तसेच आगामी काळात लॉकडाऊन लागणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यावरच आता सरकारने थेट स्पष्टीकरण दिले आहे. याबाबतचा संभ्रम दूर झाला आहे.

भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार का?

पेट्रोलियममंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सीआयआय समीटमध्ये बोलताना लॉकडाऊनची चर्चा तसेच इंधनाची कमतरता यावर भाष्य केले आहे. लवकरच लॉकडाऊन लागणार आहे, असा सोशल मीडियावर दावा केला जातोय. यावर बोलताना आपण अशा अफवांना रोखले पाहिजे. लॉकडाऊ लागणार नाही. सध्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असे पुरी यांनी सांगितले आहे.

भारताकडे पेट्रोल, डिझेलचा साठा किती?

तसेच, लवकरच पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढू शकतो, असा दावा केला जात आहे. यावरही पुरी यांनी सविस्तर भाष्य केले. पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण होणार नाही. आपल्याकडे पुरेसा साठा आहे, असे त्यांनी सांगितले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असेही आवाहन त्यांनी केले आहे. भारताकडे सध्या 60 दिवस पुरेल एवढे कच्चे तेल आहे. तसेच 60 दिवस पुरेल एवढा एलएनजीचा साठा आहे. पुढच्या 45 दिवस पुरेल एवढा एलपीजी भारताकडे आहे, असे सरकारने सांगितले आहे.

युद्धाच्या अगोदर 60 टक्के घरगुती गॅस होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येत होता. युद्धामुळे लोकांना घरगुती गॅसची कमतरता भासू नये म्हणून देशांतर्गत उत्पादन वाढवण्यात आले. अगोदर हे उत्पादन 36,000 MT वरून 54,000 MT पर्यंत वाढवण्यात आले आहे, असेही पुरी यांनी स्पष्ट केले.

Follow Us
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!