AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agarwal Case: तुझ्याकडून होत नाहीये…सियाला जिंकण्यासाठी चेतन झाला सैतान, लोहगडावरील धक्कादायक गूढ समोर!

Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सियाला जिंकण्यासाठी चेतन चौधरीने जे काही केलं ते ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला. आता नेमकं काय घडलं? जाणून घ्या..

Ketan Agarwal Case: तुझ्याकडून होत नाहीये...सियाला जिंकण्यासाठी चेतन झाला सैतान, लोहगडावरील धक्कादायक गूढ समोर!
Siya and ketanImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 29, 2026 | 3:56 PM
Share

लोणावळा येथील लोहगड किल्ल्यावरुन व्यवसायिक केतन अग्रवालला ४०० फूट खोल दरीत ढकलून त्याचा खून करण्यात आला. आता या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करताच दोघांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. दोघे आता एकमेकांवर खूनाचा आरोप लादत आहेत. पोलिसांसमोर दोघांनी असे अनेक राज उघड केले आहेत जे आतापर्यंत समोर आले नव्हते.

नेमकं काय घडलं?

समोर आलेल्या माहितीनुसार, केतन अग्रवालला दरीत ढकलण्याचा सिग्नल देण्यासाठी सियाने एक इशारा केला होता. १४ जून रोजी सिया केतनला पहिल्या प्रयत्नात मारू शकली नाही, तेव्हा चेतनने स्वतः त्याचा खून करण्याची जबाबदारी घेतली. पोलिस सूत्रांच्या मते, केतन अग्रवालचा खून करण्याची हा तिसरा प्रयत्न होता. यापूर्वी दोन वेळा सिया गोयल होणारा पती केतनला लोहगड किल्ल्यावर घेऊन गेली होती, पण ती त्याला दरीत ढकलू शकली नाही. सियाने पोलिसांना सांगितले की, १४ जून रोजी दुसरा प्रयत्नही अयशस्वी झाल्यानंतर चेतन वैतागला आणि सियासमोर रडलाही. दोन वेळा अपयश आल्यानंतर चेतनचा संयम सुटला आणि त्याने सियाला म्हटले, “तुझ्याकडून होत नाहीये, आता मी स्वतः याला संपवतो.” त्यानंतर १८ जून रोजी चेतनने स्वतः सूत्रे हाती घेतली आणि केतनला दरीत ढकलले. पोलिसांच्या मते, चेतन लवकरात लवकर केतनला रस्त्यातून हटवून सियासोबत महाबळेश्वरमध्ये एकांतात वेळ घालवू इच्छित होता.

रिपोर्टनुसार, सिया गोयलने चौकशीत कबूल केले की, केतनला खोल दरीत ढकलण्यासाठी दोघांनी आधीच एक कोड सिग्नल ठरवून ठेवला होता. प्लॅननुसार, सियाने बसून इशारा करायचा होता. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “नियोजित योजनेअनुसार सियाने बसून इशारा करायचा आणि त्यानंतर चेतनने पुढे येऊन केतनला दरीत ढकलायचे. त्यांनी योजना अगदी तशीच अमलात आणली.” अधिकाऱ्याने पुढे म्हटले, “सिया आणि चेतनने आम्हाला सांगितले की नेमके काय घडले आणि कसे घडले. केतनला याचा अजिबात अंदाज नव्हता की त्याच्यासोबत काय होणार आहे. तो काहीही समजून घेण्यापूर्वीच त्याला दरीत ढकलण्यात आले.”

एकमेकांवर आरोप

पोलिसांच्या चौकशीदरम्यान सिया आणि चेतन एकमेकांवर आरोप करताना दिसले. एका अधिकाऱ्याने सांगितले, “सुरुवातीला सिया आणि चेतन दोघांनी एकमेकांवर दोष ढकलण्याचा प्रयत्न केला, जी आरोपींसाठी चौकशीत सामान्य गोष्ट आहे. मात्र शेवटी सियाने कबूल केले की साजिश तिनेच रचली होती आणि चेतनही त्यात सामील होता.” अधिकाऱ्याने सांगितले की, चेतनने सुरुवातीला दावा केला होता की तो किल्ल्यात होता, पण जिथून केतनला ढकलण्यात आले त्या जागी तो गेला नव्हता आणि त्याला काहीही माहिती नव्हते. “मात्र हे स्पष्ट होते की तो खोटे बोलत होता. शेवटी दोघांनी गुन्ह्यात आपली भूमिका कबूल केली आणि संपूर्ण घटनाक्रम सांगितला.”

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात