AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हरियाणात मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला कसा असेल? कोण होईल मुख्यमंत्री?

हरियाणात भाजपच्या हॅट्ट्रिकनंतर नवे सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपच्या सूत्रांवर विश्वास ठेवला तर मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम शनिवारी दसऱ्याच्या दिवशी होण्याची शक्यता आहे. हरियाणात मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला कसा असेल समजून घ्या.

हरियाणात मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला कसा असेल? कोण होईल मुख्यमंत्री?
| Updated on: Oct 09, 2024 | 6:16 PM
Share

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता भाजप स्वबळावर स्थापन करणार आहे. भाजपला हरियाणात ४८ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सरकार स्थापन करताना मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सरकार कधी स्थापन होणार आणि नवीन सरकारची रचना काय असेल? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सरकार स्थापनेबाबत नायब सैनी म्हणाले की, अद्याप तारीख ठरलेली नाही. विजयादशमीच्या दिवशी नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. सरकारच्या रचनेबाबतही चर्चा सुरु आहे. कारण सध्याच्या सरकारच्या मंत्र्यांबद्दल जनतेची नाराजी आहे. सरकारचे 8 मंत्री निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यामुळे भाजप सरकारमध्ये नव्या लोकांना संधी मिळणार आहे.

सरकारची रचना कशी असेल?

निवडणुकीनंतर भाजपने मुख्यमंत्रीपदाबाबत अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. पण नायबसिंग सैनी हेच मुख्यमंत्री असतील अशी सूत्रांची माहिती आहे. हरियाणाचे निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांनी सरकार स्थापन झाल्यास सैनी मुख्यमंत्री होतील, असे स्पष्टपणे सांगितले आहे. अशा स्थितीत सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री होऊ शकतात, असे बोलले जात आहे. सैनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेतली आहे. लवकरच पक्षाकडून अधिकृत घोषणेची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते.

हरियाणात मुख्यमंत्र्यासह एकूण 14 मंत्री शपथ घेऊ शकतात. मागील सरकारमधील 8 मंत्री निवडणुकीत पराभूत झाले आहेत. तर 3 मंत्र्यांची तिकिटे कापण्यात आली होती. केवळ 2 मंत्र्यांना निवडणूक जिंकण्यात यश आले आहे. त्यामुळेच निवडणुकीच्या निकालानंतर सैनी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.

कोणत्या जातींना प्राधान्य मिळू शकते?

सैनी यांच्या मंत्रिमंडळात दलित, अहिर, गुर्जर आणि इतर बिगर जाट ओबीसींबरोबरच ब्राह्मण आणि राजपूतांनीही भाजपच्या बाजूने प्रचंड मतदान केले आहे. अशा स्थितीत या जातींचे राजकीय वर्चस्व सरकारमध्ये दिसून येते. भाजपचे सुमारे 9 दलित आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे सरकारमध्ये दलितांचा सहभाग वाढू शकतो, असे बोलले जात आहे.

नायब सैनी यांच्या मागील सरकारमध्ये 2 मंत्री दलित समाजाचे होते. यावेळी ब्राह्मण आणि राजपूत समाजातील अधिक आमदार विजयी झाले आहेत. अशा स्थितीत मंत्रिमंडळात या समाजांचा सहभागही वाढू शकतो.

उपमुख्यमंत्री किती असतील

2014 मध्ये हरियाणात भाजपने स्वबळावर सरकार स्थापन केले तेव्हा कोणालाही उपमुख्यमंत्री बनवले नाही. 2019 मध्ये, जेजेपीच्या मदतीने भाजपने सरकार स्थापन केले होते. तेव्हा दुष्यंत चौटाला यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले होते. आता २०२४ मध्ये नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होणार की नाही यावर सस्पेन्स कायम आहे. मात्र, यूपी, एमपी, राजस्थान या राज्यांमध्ये भाजपने उपमुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हरियाणातही उपमुख्यमंत्री केले जाऊ शकतात.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.