Wrestler Nisha Dahiya Murder: कोच झाला फरार; पोलीसांकडून माहिती देणार्‍याला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

सोनीपतमध्ये कुस्तीपटू आणि तिच्या भावाची गोळ्या झाडून हत्येची घटना घडली आहे आणि ही निशा दहिया आणि पदक विजेती कुस्तीपटू निशा दहिया या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत, असं सोनीपतचे एसपी, राहुल शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे.

Wrestler Nisha Dahiya Murder: कोच झाला फरार; पोलीसांकडून माहिती देणार्‍याला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर
Nisha Dahiya's father
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 3:57 PM

चंदीगड: राष्ट्रीय पदक विजेती कुस्तीपटू निशा दहिया आणि तीच्या भावाची गोळ्या झाडून हत्या झाल्याची अशी माहिती बुधवारी मिळाली होती. मात्र, निशाने एक व्हिडीओ शेअर करत मी ठणठणीत आहे आणि आगामी सामन्याची तयारी करत असल्याचे सांगितले आहे. परंतू, सोनीपतमध्ये कुस्तीपटू आणि तिच्या भावाची गोळ्या झाडून हत्येची घटना घडली आहे आणि ही निशा दहिया आणि पदक विजेती कुस्तीपटू निशा दहिया या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत, असं सोनीपतचे एसपी, राहुल शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले, “ही निशा दहिया (गोळी मारून ठार झालेली) आणि पदक विजेती कुस्तीपटू निशा दहिया हे दोन वेगळे लोक आहेत. पदक विजेती कुस्तीगीर पानिपतची आहे आणि आता एका कार्यक्रमात आहे.” (Haryana Wrestler Nisha Dahiya Murder case Father accuses absconding coach)

दरम्यान, मृत कुस्तीपटू निशाचे वडील दयानंद दहिया यांन तीच्या कुस्ती अकादमीच्या कोच वर आरोप लावला आहे. “ते निशाला त्रास देत होते. तिने याबाबत तीच्या आईला सांगितले होते. मी माझ्या मुलीला अकादमीबद्दल चेतावणी दिली होती, पण त्यांनी (आरोपी) तिचे ब्रेनवॉश केले. वेगवेगळ्या कारणांसाठी ते सतत पैशांची मागणीही करत होते, असं ते म्हणाले.

मृत भावंड हे हलालपूर गावातील होते. प्रथमदर्शनी असे आढळून आले की ही नीशा, अकादमीत सरावासाठी यायची. तिची आणि तिच्या भावाची कोच आणि त्याच्या मित्रांनी गोळ्या झाडून हत्या केली. नीशाच्या आईला रोहतकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे, एसपी म्हणाले.

दरम्यान, सोनीपतच्या पोलीसांनी काही लोकांना ताब्यात घेतले आहे. हत्येमागचे कारण तपासले जात आहे. मुख्य आरोपी पवन, जो कोच आहे, त्याची माहिती देणार्‍याला पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. नीशाच्या आईने तीच्या कोच निशाचा छळ केरायचा असा आरोप केला आहे, मयंक गुप्ता, एएसपी, खरखोडा यांनी माहिती दिली.

Other News

एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करुन मृतदेह पुरले, पोलिसांकडून 4 जणांना बेड्या

मोठी बातमीः औरंगाबादमध्ये ईडीचे धाडसत्र, दोन उद्योजक निशाण्यावर, सात ठिकाणी छापे

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.