AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या आधार कार्डवर दुसऱ्याने तर सीम कार्ड घेतलं नाहीना? घाबरून जाऊ नका, असं चेक करा

आजच्या काळामध्ये आधार कार्ड हा आपल्या ओळखीचा महत्त्वाचा पुरावा बनला आहे. परंतु कधी-कधी असं देखील होऊ शकतं, तुमच्या आधार कार्डचा चुकीच्या पद्धतीने वापर करून भलताच व्यक्ती सीम कार्डची खरेदी करू शकतो.

तुमच्या आधार कार्डवर दुसऱ्याने तर सीम कार्ड घेतलं नाहीना? घाबरून जाऊ नका, असं चेक करा
तुमच्या आधारवर किती सीम कार्ड?Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 09, 2026 | 5:45 PM
Share

आजच्या काळामध्ये आधार कार्ड हा आपल्या ओळखीचा महत्त्वाचा पुरावा बनला आहे. तुम्हाला जर काही महत्त्वाची सरकारी कागदपत्रं काढायची असतील किंवा इतर कोणतंही महत्त्वाचं काम करायचं असेल तर तिथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड सबमिट करावं लागतं. तुम्हाला जर मोबाईलच्या दुकानातून एखादं नवं सिम कार्ड जरी खरेदी करायचं असेल तरी देखील तिथे ओळखीचा पुरावा म्हणून तुम्हाला आधार कार्ड द्यावं लागतं. तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला सीम कार्ड मिळत नाही. मात्र अनेकदा असं देखील होतं की, तुमच्या आधार कार्डचा कधी-कधी गैर वापर देखील होऊ शकतो. जसं की तुमच्या आधार कार्डचा वापर करून भलतचं कोणी तरी सीम कार्ड देखील खरेदी करू शकतो. जर एखाद्या व्यक्तीने तुमच्या आधार कार्डचा वापर करून सीम कार्ड खरेदी केलं आणि त्याचा त्याने चुकीचा वापर केला, तर त्यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे तुम्हाला आता असा प्रश्न पडलाच असेल तुमच्या नावाने दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने तर सीम कार्ड घेतलं नाही ना?

आतापर्यंत आपल्या आधार कार्डचा वापर करून किती सीम कार्ड खरेदी करण्यात आले आहेत? हे कसं ओळखायचं? यासाठी सरकारने संचार साथी नावाच्या वेब पोर्टलवर TAFCOP नावाची सुविधा दिली आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या नावावर सध्या स्थितीमध्ये किती सीम सक्रिय आहेत, याची माहिती जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही अनोळखी साईटवर तुमचा आधार नंबर टाकण्याची गरज नाही. तुम्ही संचार साथी वेबसाईटच्या मदतीने याची माहिती घेऊ शकतात.

सर्वात प्रथम संचार साथी वेबपोर्टवर क्लिक करा. तिथे तुमचा आधार नंबर टाका. त्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी नंबर येईल. तो ओटीपी टाकून तुम्हाला माहिती व्हेरिफाय करायची आहे. माहिती व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर सध्या स्थितीमध्ये किती मोबाईल नंबर सक्रिय आहेत, त्याची माहिती मिळेल. त्या सीम कार्डचा नंबर आणि ते सीम कार्ड घेताना दिलेला पत्ता देखील तिथे तुम्हाला दिसेल. जर समजा तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर एखादा तुम्ही वापरत नसेला अनोळखी नंबर आढळून आलाच तर घाबरून जाण्याचं कारण नाही, तुम्ही याच पोर्टच्या माध्यमातून त्या कार्डला ब्लॉक करू शकता, त्यानंतर सरकारच्या वतीने त्यावर कारवाई होते.

Follow Us
दहीहंडी उत्सवात नियमभंग; पुणे नागपुरात 28 जणांवर गुन्हे दाखल
दहीहंडी उत्सवात नियमभंग; पुणे नागपुरात 28 जणांवर गुन्हे दाखल
भाजप मोठ्या तयारीत? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या...
भाजप मोठ्या तयारीत? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... अमित शहा...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... शहांचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप,
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप, व्हिडीओ व्हायरल
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर...
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर घात केला अन्...
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरे..
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरेंनी थेट...
3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! सामंत, लाडांनी आकडेवारीच सांगितली
Maratha Reservation | मराठवाड्यात 3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! उदय सामंत-प्रसाद लाडांनी आकडेवारीच सांगितली
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली;12 तारखेला अंतरवालीत होणार...
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली; 12 तारखेला अंतरवालीत होणार बैठक
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे...
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंचा व्हिसीद्वारे जबाब
जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा जरांगेंवर घ
Ajay Baraskar | जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा मनोज जरांगेंवर घणाघात