
एका १२ वर्षांच्या मुलाची कहाणी ऐकून न्यायदानासाठी जजेसच्या खुर्चीवर बसलेल्या न्यायमूर्तींचेही हृदय हेलावले आणि त्यांनी आपलाच निकाल बदलल्याचा आश्चर्यकारक प्रकार घडला आहे. सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी आई-वडीलांच्या भांडणांमुळे मानसित आणि भावनिकदृष्टीने खचलेल्या मुलाची हृदयद्रावक कहानी ऐकली आणि खंडपीठाने या मुलाची कस्ठडी त्याच्या आईकडे दिली आहे.
या मुलाचे हाल पाहून देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठावरील जजेसचे मन गलबलले. मग कोर्टाने स्वत:च दहा महिन्यांपूर्वी दिलेला आदेश बदलून या मुलाची कस्ठडी पुन्हा त्याच्या आईकडे देण्याचा निर्णय घेतला. या मुलाची कस्ठडी त्याच्या पित्याकडे देऊन आपली चुक झाल्याची कबुलीही सुप्रीम कोर्टाने दिली आहे.
सुप्रीम कोर्टाचे न्या. विक्रम नाथ आणि न्या.प्रसन्ना बी.वराळे यांच्या खंडपीठाने आपल्या निकालात मान्य केले की सुप्रीम कोर्ट आणि केरळ हायकोर्टाने मुलाची कस्ठडी पित्याकडे सोपवण्याचा आदेश दिला होता. यामुळे मुलाचे मानसिक आणि भावनिक स्थिती बिघडली होती. कोर्टाने मुलाच्या मनाचा विचार न करता एकमेकांशी वाईट प्रकारे भांडणाऱ्या दाम्पत्याच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादाआधारे निकाल दिला होता.
हा मुलगा कोर्टाच्या आदेशामुळे आता वेल्लोरच्या ख्रिश्चियन मेडिकल कॉलेजच्या मानसविकार विभागात उपचार घेत आहे. आपल्या चुकीची जाणीव झाल्याने कोर्टाने म्हटले की आता तो त्याच्या आईकडे राहील. जरी त्याच्या आईने आता दुसर लग्न केले असले तरीही. अर्थात त्याच्या पित्याला त्याला भेटता येईल असेही निकाल कोर्टाने म्हटले आहे.
या मुलाचे प्रकरण अशा किचकट आणि भावनात्मक प्रकरणात न्यायिक कारवाईतील उणीवा दाखवत आहे. ज्याचा निकाल कोर्टात आई-वडिलांच्या वकीलांच्या युक्तीवादानंतर दिला जातो. मुलाशी बोलल्याशिवाय किंवा त्याच्या बायोलॉजिकल आई-वडिलांशी त्याचे नाते कशाप्रकारचे आहे हे न जाणता असा निकाल दिला होता.
हे उदाहरण आहे कोर्टांनी वेगवेगळ्या रहात असलेल्या आई-वडिलांच्या दरम्यान मुलांच्या कस्ठडीच्या वादाचा निकाल केवळ कोर्ट रुममध्ये करु नयेत. त्याऐवजी त्या मुलांशी बोलावे, आई-वडिलांशी त्याची पसंद आणि सहजतेचा स्तर या संदर्भात सर्व जाणून घेणे गरजेचे आहे. आता सुप्रीम कोर्टाने मान्य केले की त्यांनी आणि केरळच्या हायकोर्टाच्या निकालात मुलाची कस्ठडी पित्याकडे देण्याची चूक झाली. जो १२ वर्षांत काही वेळात मुलाला भेटायला आला होता.
खंडपीठाने म्हटले की कोर्टाच्या आदेशाने मुलाच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम झाला आहे. आणि त्यांनी मुलाची कस्ठडी आईला देत आपला निकाल बदलला आहे. जरी कोर्टाला ही माहीती होती की आईने दुसरे लग्न केले आहे. या प्रकरणात साल २०११ मध्ये लग्नाच्या दोन वर्षांनंतरच या दाम्पत्याचा घटस्फोट झाला होता.
घटस्फोटाच्या चार वर्षांनंतर मुलाच्या आईने दुसरे लग्न केले. साल २०२२ मध्ये पित्याने मुलाच्या कस्ठडीसाठी फॅमिली कोर्टाचा दरवाजा ठोठावला. मुलाची आई दुसऱ्या पती सोबत मलेशियाला जात असल्याचे कारण त्याने दिले होते. केरळ हायकोर्टाने आणि गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सुप्रीम कोर्टाने त्याची याचिका स्वीकारली.
कोर्टाच्या आदेशामुळे मुलाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आणि त्याच्या अहवालात म्हटले होते की हा मुलगा चिंतेने आणि भीतीने ग्रस्त झाला आहे. त्यामुळे आजारी पडण्याचा धोका वाढला आहे. त्यानंतर आईने हा आदेश मागे घ्यावा यासाठी पुनर्विचार याचिका दाखल केली आणि कोर्टासमोर मेडिकल रिपोर्ट दाखल केला.