AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीच्या रात्री वाढला वाद… हार्ट अटॅक पराठेवाल्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; काय आहे प्रकरण?

जालंधरचा प्रसिद्ध 'हार्ट अटॅक पराठेवाला' बीर दविंदर सिंग पोलिसांच्या त्रासाने त्रस्त आहे. रात्री उशिरापर्यंत दुकान उघडं ठेवल्यामुळे पोलीस शिवीगाळ, मारहाण आणि धमक्या देत असल्याचा त्याचा आरोप आहे. दिवाळीच्या रात्री 60 वर्षीय आईशीही पोलिसांनी गैरवर्तन केल्याचं तो सांगतो. दविंदर सिंगने या गंभीर छळाविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

दिवाळीच्या रात्री वाढला वाद... हार्ट अटॅक पराठेवाल्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; काय आहे प्रकरण?
| Updated on: Oct 21, 2025 | 2:26 PM
Share

पंजाबच्या जालंधरच्या मॉडल टाऊन परिसरातील लोकप्रिय पराठेवाला बीर दविंदर सिंग चांगलाच त्रस्त झाला आहे. बीर दविंदर सिंग याने थेट स्थानिक पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी मला केवळ शिवीगाळ केली नाही तर मारहाणही केलीय. मला रोजच पोलिसांच्या त्रासाचा सामना करावा लागत आहेत, असा दावा बीर दविंदर सिंग याने केला आहे. दविंदर सिंग एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने आपल्या दाव्याचं समर्थन करणारा एक व्हिडीओच सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात पोलिसांसोबत त्याची बाचाबाची सुरू असल्याचं दिसत आहे. दरम्यान, दविंदर सिंग यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडेच तक्रार केली असून न्याय देण्याची मागणी केली आहे.

दविंदर सिंग याने पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांची वाहने दुकानाच्या बाहेर येतात. पोलीस माझ्याशी चुकीच्या पद्धतीने वागतात. पोलीस मला आणि माझ्या कुटुंबीयांना रोजच त्रास देत आहे. माझ्या जीवाला धोका असून मला ठार मारलंही जाऊ शकतं. दिवाळीच्या रात्री तर पोलिसांनी माझ्या 60 वर्षाच्या आईशी हुज्जत घातली आणि शिवीगाळ केली, असा आरोप त्याने केला आहे. या व्हिडीओत दविंदर सिंग पोलिसांशी वाद घालताना दिसत आहे. पोलीस त्याचं काहीही एक ऐकण्याच्या मनस्थितीत नसून त्याला दमदाटी करतानाही दिसत आहे. दविंदरच्या दाव्यानुसार, पोलीस रोज येऊन धमकावत आहेत. माझं दुकान बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत.

रात्री उशिरापर्यंत…

वीर दविंदर सिंग याचे दुकान रात्री उशिरापर्यंत उघडे असते. या ठिकाणी लोक त्याच्या हातचे खास हार्ट अटॅक पराठे खायला येतात. दविंदरचे हे पराठे संपूर्ण पंजाबमध्ये फेमस आहेत. त्याचे पराठे खाण्यासाठी लोक दुरून दुरून येतात. त्याच्या पराठ्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याने त्याला हार्ट अटॅक पराठेवाला म्हणूनच ओळखलं जाऊ लागलंय. दरम्यान, दविंदरचं दुकान रात्री उशिरापर्यंत उघडं असतं. ते नियमाच्या विरोधात आहे. पोलीस त्याला रात्री उशिरापर्यंत दुकान सुरू न ठेवण्यास सांगत आहे. पण दविंदर ऐकत नाही. त्यामुळेच पोलीस आणि दविंदर यांच्यात वाद निर्माण झाला आहे, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

कपिल शर्माही फिदा

प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन कपिल शर्माही हार्ट अटॅक पराठेचा जबरा फॅन आहे. कपिल शर्माने त्याच्या कुटुंबासहीत दविंदर सिंगचे पराठे खाल्ले आहेत. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर दविंदर अधिकच लोकप्रिय झाला होता. त्यानंतर त्याचे ग्राहकही वाढले आहेत. त्यामुळेच त्याला रात्री उशिरापर्यंत पराठ्याचे दुकान सुरु ठेवावं लागत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...