उन्हाचा तडाखा वाढला, अनेक भागात उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट

Heat wave : उन्हाचा तडाखा वाढला आहे. देशात अनेक भागात उष्णता वाढली आहे. त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडणं टाळलं पाहिजे. उन्हाळ्यात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी. जाणून घ्या.

उन्हाचा तडाखा वाढला, अनेक भागात उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट
HEAT WAVE
Follow us
| Updated on: Apr 08, 2024 | 4:18 PM

Heat Wave : एप्रिल महिना सुरू झाला आहे. दुपारच्या वेळेत लोकांना बाहेर पडणं कठीण झाले आहे. येत्या दोन दिवसांत कडक उन्हाचा तडाखा बसणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) शनिवारी उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट जारी केलाय. पूर्व भारतात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, विदर्भ, उत्तर कर्नाटक, किनारी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या ठिकाणी उन्हाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.

उष्णतेची लाट म्हणजे काय?

IMD नुसार, जेव्हा हवेचे तापमान अशा पातळीपर्यंत पोहोचते ज्यामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. एखाद्या ठिकाणचे कमाल तापमान मैदानी भागासाठी 40 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक आणि डोंगराळ भागात 30 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक असेल तेव्हा ‘उष्णतेची लाट’ म्हणून ती ओळखली जाते.

स्वतःचे संरक्षण कसे करावे?

  • काही महत्त्वाचे काम नसेल तर घराबाहेर पडू नका
  • भरपूर प्रमाणात पाणी प्या
  • आपत्कालीन किट घरी ठेवा
  • दिवसा सर्वात गरम भाग पडद्यांनी झाकून टाका

एप्रिलच्या पहिला आठवड्यात अनेक भागात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने अनेक राज्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असला तरी काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज भारताच्या दक्षिण भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पूर्व, मध्य आणि द्वीपकल्पीय भारतात हलका ते मध्यम पाऊस आणि गारपिटीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

तेलंगणा आणि उत्तर तामिळनाडूच्या अनेक भागांमध्ये, केरळ, किनारी आंध्र प्रदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण पश्चिम मध्य प्रदेशातील काही भागात तापमान ४०-४२ अंश सेल्सिअस दरम्यान असण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, ईशान्य भारतात 9 एप्रिलपर्यंत पाऊस/वादळाचा वेग कायम राहील.

राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेच्या झळा बसत आहेत. लोकं देखील दुपारी घराबाहेर पडणं टाळत आहेत.

तापमान वाढल्याने स्ट्रोकसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवा त्यासाठी भरपूर पाणी प्या. या वेळेत तुम्ही बाहेर पडताना सोबत पाण्याची बाटली ठेवा. ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी प्या. उन्हाळ्यात सैल आणि सुती कपडे घाला. उन्हात कष्टाची कामे केल्याने उष्माघाताचा त्रास होऊ शकतो.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.