Monsoon : मुबंई-ठाण्यात मुसळधार, जूनच्या अंतिम टप्प्यात मराठवाड्यातही मान्सून सक्रीय

हवामान विभागाच्या अंदाजानुसार या आठलड्याच्या पहिल्या दिवसापासूनच मान्सूनमध्ये बदल झाला आहे. आतार्यंत पावसामध्ये लहरीपणा होता तर कोकण आणि मुंबई, ठाणे वगळता उर्वरिकत राज्यात पाऊस हा पूर्ण क्षमतेने सक्रीय झाला नव्हता पण आता परस्थिती बदलत आहे. मंगळवारपासून कोकणासह मुंबई आणि ठाणे या परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Monsoon : मुबंई-ठाण्यात मुसळधार, जूनच्या अंतिम टप्प्यात मराठवाड्यातही मान्सून सक्रीय
राज्यात मान्सून सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 5:50 PM

मुंबई : हंगामाच्या सुरवातीपासूनच राज्यात (Monsoon) मान्सूनचा लहरीपणा पाहवयास मिळाला आहे. आतापर्यंत कोकण, मुंबई आणि ठाणे परिसरात बरसणार पाऊस आता राज्यात सक्रीय झाला आहे. विशेष म्हणजे कोरडेठाक असलेल्या (Marathwada) मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे रखडलेल्या शेती कामांना वेग येणार असून पावसामध्ये सातत्य राहिले तर खरिपाच्या पेरण्याही होतील असा विश्वास निर्माण झाला आहे. आगामी 5 दिवसांमध्ये मुंबई ठाण्यासह कोकणात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज (Meteorological Department) हवामान विभागाने वर्तवला आहे. तर उर्वरीत राज्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे महिन्याभराच्या कालावधीनंतर का होईना परस्थितीमध्ये बदल होईल का हेच पहावे लागणार आहे.

या भागात ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार या आठलड्याच्या पहिल्या दिवसापासूनच मान्सूनमध्ये बदल झाला आहे. आतार्यंत पावसामध्ये लहरीपणा होता तर कोकण आणि मुंबई, ठाणे वगळता उर्वरिकत राज्यात पाऊस हा पूर्ण क्षमतेने सक्रीय झाला नव्हता पण आता परस्थिती बदलत आहे. मंगळवारपासून कोकणासह मुंबई आणि ठाणे या परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या भागात पावसाचा जोर वाढणार आहे. गेल्या काही दिवसांपासून रिमझिम असलेले रुपडे आता मान्सून बदलत आहे. याचा फायदा आगामी काळात होणार आहे.

मध्य महाराष्ट्रातही पावसाचे कमबॅक

हंगामाच्या सुरवातीला काही प्रमाणात मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र, गायब झालेला पाऊस आता जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून बरसणार आहे. 26 जूनपासून सोलापूर, पुणे, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये बरसणार आहे. सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. जूनच्या अखेरीस पावसाने हजेरी लावली तरच खरीप हंगमातील पिके बहरणार आहेत. अन्यथा उत्पादनावर परिणाम होणार आहे.

खरीपाबाबत आशादायी वातावरण

गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या लहरीपणामुळे खरिपातील पेरण्या होतात की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती. शिवाय गतवर्षीच्या तुलनेत 22 टक्क्यांना पेरणी क्षेत्र हे घटलेले आहे. असे असतानाही पावसाने उघडीप दिल्याने भविष्यातही पेरण्या होतील की नाही अशी स्थिती आहे. हे ,सर्व होताना कृषी विभागाने मात्र, 75 ते 100 मिमी पावासाची नोंद झाल्याशिवाय पेरणी करु नये असे आवाहन केले होते. आता सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यास शेत शिवार फुलेल अशी आशा आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.