Rip cds bipin rawat : बिपीन रावतांना अनेक देशातून श्रद्धांजली, रशिया, इस्त्राईल, पाकिस्तान म्हणाला…

रावत यांच्या जाण्यावर इस्त्राईल, श्रीलंका आणि भूटानच्या पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे. इस्त्राईलचे दूत नाओर गिलोन यांनी बिपीन रावत यांचा फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटचा प्रोफाईल फोटो ठेवत हळहळ व्यक्त केली आहे.

Rip cds bipin rawat : बिपीन रावतांना अनेक देशातून श्रद्धांजली, रशिया, इस्त्राईल, पाकिस्तान म्हणाला...
बिपीन रावत

मुंबई : सीडीएस बिपीन रावत यांच्या जाण्याने संपूर्ण भारत दु:खात बुडाला आहे. त्यांना अनेक स्तरातून मानवंदना देण्यात येत आहे. बिपीन रावत यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी वाहून घेतलं होतं, त्यांचे वडील सैन्यात होते. तर त्यांची पत्नी गृहिणी असूनही सैन्याच्या परिवारांसाठी एका संस्थेच्या मध्यमातून काम करत होत्या. असे व्यक्तिमहत्व देशाने गमावल्याने फक्त भारतातूनच नाही तर संपूर्ण जगातून हळहळ व्यक्त केली जात आहे. कारण एक सच्चा सैनिक काय असतो याचं उत्तम उदाहण म्हणजे बिपीन रावत.

रशिया, इस्त्राईल, पाकिस्तानकडून दु:ख व्यक्त

रावत यांच्या जाण्यावर इस्त्राईल, श्रीलंका आणि भूटानच्या पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे. इस्त्राईलचे दूत नाओर गिलोन यांनी बिपीन रावत यांचा फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटचा प्रोफाईल फोटो ठेवत हळहळ व्यक्त केली आहे. अमिरिका, पाकिस्तान आणि मालदिवनेही हळहळ व्यक्त केली आहे. अमेरिकेने रावत यांच्या रुपाने एक सच्चा दोस्त गमावल्याचं म्हटलं आहे.

श्रीलंकेच्या पंतप्रधानांचं ट्विट

श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपाक्षे यांनी ट्विट करत, रावत आणि त्यांच्या परिवाराचा असा मृत्यू होणे धक्कादायक आहे. आमच्या संवेदना तुमच्या परिवाराबरोबर आहेत असे म्हटले आहे.

त्यामुळे रावत यांच्या जाण्याने जगलाही धक्का बसला आहे. हे भारताचं कधीही न भरून निघणारे नुकसान आहे. रावत आणि त्यांच्या पत्नीचं पार्थिव उद्या दिल्लीत आणले जाणार आहे.


Published On - 10:52 pm, Wed, 8 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI