झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना ईडीने समन्स देऊनही ते गेले नाहीत, म्हणाले हिम्मत आहे तर अटक करुन दाखवा…

| Updated on: Nov 03, 2022 | 4:11 PM

बेकायदेशीर खाणकाम प्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्र्यांना ईडीने समन्स दिले आहे,तर त्यांनी पलटवार खात ईडीलाच तुमच्यात हिम्मत आहे तर अटक करुन दाखवा असं आव्हान केले गेले आहे.

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना ईडीने समन्स देऊनही ते गेले नाहीत, म्हणाले हिम्मत आहे तर अटक करुन दाखवा...
Follow us on

नवी दिल्लीः झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना बेकायदेशीर खाणकाम केल्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना समन्स बजावली होती. मात्र हेमंत सोरेन हजर झाले नाहीत. त्यानंतर हेमंत सोरेन यांनी ईडीलाच आव्हान देत मी खरोखरच दोषी असेल तर मला तुम्ही अटक करुन दाखवा असे म्हटले आहे. या प्रकरणी झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते रांची येथे एकत्र येऊन भाजप आणि केंद्र सरकारचा निषेध करत आहेत. यावेळी हेमंत सोरेन यांनी भाजपवर सडकून टीका केली.

हेमंत सोरेन यांनी ईडी आणि केंद्र सरकारवर टीका करत त्यांनी आदिवासींचा प्रश्नही उपस्थित केला. त्यावेळी ते म्हणाले की, राज्यात काही बाहेरच्या टोळ्या घुसत असून तिच लोकं येथील आदिवासींना स्वतःच्या पायावर उभा राहू देत नाहीत.

यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका करत सांगितली की राज्यात झारखंडी लोकं राज्य करतील बाहेरुन आलेले येथे राहणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले की, भाजपचा झारखंड सुफडासाफ होणार आहे.

त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यातील कामगार, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक हेच भाजपला त्यांच्या भाषेत उत्तर देतील असंही त्यांनी सांगितले.

ईडीकडून पाठवण्यात आलेल्या समन्सविषयी बोलताना हेमंत सोरेन म्हणाले की, ज्यावेळी मला आदिवासी परिषदेचे निमंत्रण मिळाले होते, त्याच दिवशी हे समन्स मिळाले आहे.

ईडीला मी गुन्हेगार वाटत असेल तर त्यांनी मला येथे येऊन अटक करुन दाखवावी असे आव्हानच त्यांनी ईडीला केले आहे.

यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला, जे अंमलबजावणी संचालनालय केंद्रातील सरकारच्या इशाऱ्यावर चालते त्यांच्याकडून आपली बदनामी होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच झारखंडची जनता याविरोधा रस्त्यावर उतरली असल्याचे त्यांनी सांगितले.

हेमंत सोरेन यांनी आपल्या सरकारच्या कामाविषयी बोलतान सांगितले की, आमच्या सरकारच्या कामामुळेच भाजपवाल्यांच्या पोटात गोळा येत आहे.

त्यामुळेच त्यांच्याकडून अशा प्रकारची कटकारस्थाने केली जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आमच्या विरोधकांना कोळसा आणि लोखंडामध्ये होत असलेला भ्रष्टाचार दिसत नाही मात्र वाळूसारख्या गोष्टींतून त्यांना मोठा भ्रष्टाचार दिसत असल्याचे म्हणत त्यांनी त्यांच्यावर टीका केली.

त्यामुळेच विरोधक आपल्या पापाचे खापर सध्याच्या सरकारवर टाकू पाहत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आम्हाला सत्ता ही लढाईतून मिळाली आहे, त्यामुळे या विरोधकांच्या या लढाईविरोधात जोरदार पणे लढून त्यांचा डाव हाणून पाडू असंही ते म्हणाले.