AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Coal Crisis – कोळसा संकटावर केंद्र सरकार गंभीर, अमित शाहा यांच्या घरी कोळसा, वीज आणि रेल्वे मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक, पॉवर प्लँट्सपर्यंत कोळसा पोहचण्यावर भर

देशातील १२ राज्यांमध्ये सध्या वीज संकट सुरु आहे.

Coal Crisis - कोळसा संकटावर केंद्र सरकार गंभीर, अमित शाहा यांच्या घरी कोळसा, वीज आणि रेल्वे मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक, पॉवर प्लँट्सपर्यंत कोळसा पोहचण्यावर भर
कोळशाबाबतची मोठी बातमीImage Credit source: tv9
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: May 02, 2022 | 5:20 PM
Share

नवी दिल्ली – देशताली कोळसा संकटावर (Coal Crisis) सोमवारी गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) यांच्या घरी उच्चस्तरीय महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav), ऊर्जामंत्री आर के सिंह (R K singh) आणि कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी हे उपस्थित होते. या बैठकीत कोळसा आणि ऊर्जा खात्याच्या सचिवांसह इतरही अनमेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. गेल्या काही दिवसांत संपूर्ण देशात वीजद संकट ओढावले आहे. याबाबत अनेक राज्य सरकारांनी कोळसा संकटाचा मुद्दा उपस्थित केला होता. देशातील १२ राज्यांमध्ये सध्या वीज संकट सुरु असून, ऐन उन्हाळात आलेल्या या संकटामुळे राज्य सरकारांना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागतो आहे. यात राजस्थान, मध्यप्रदेश, बिहार, उ. प्रदेशसह १२ राज्यांचा समावेश आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत वीजेची मागणी वाढते त्यामुळे वीजनिर्मितीसाठी जास्त कोळसा लागत असल्याची माहिती अखिल भारतीय उर्जा महासंघाच्या वतीने देण्यात आली आहे.

उन्हाळ्याच्या काळात पीक हवर्समध्ये लागणाऱ्या वीज पुरवठ्याने नोंदवला नवा रेकॉर्ड

देशभरात सध्या उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत आहेतक. ४० ते ४५ अँश सेल्सिअस तापमानाची नोंद सर्वच ठिकाणी होताना दिसते आहे. यामुळे वीजेची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. गेल्या आठवड्यात वीजेची मागणी आणि त्यानंतर झालेला पुरवठा हा तीन वेळा रेकॉर्ड स्तरावर नोंदवण्यात आला आहे. २६ एप्रिल रोजी २०१.६५ गीगा वॅट्स वीजेचा पुरवठा करण्यात आला होता. २९ एप्रिलला ही आकडेवारी २०७.११ गीगा वॅट्सपर्यंत पोहचली. २७ एप्रिलला हा पुरवठा २००.६५ गीगावॅट्सपर्यंत पोहचला होता. गेल्या वर्षी ७ जुलैला पीक हवर्समध्ये वीजेचा पुरवठा २००.५३ गीगावॅट्सपर्यंत पोहचला होता.

देशात वीजेच्या उत्पादनासाठी ७० टक्के कोळशाचा वापर

देशात उत्पादित होणारी २०० गीगावॅट वीज म्हणजेच सुमारे ७० टक्के वीजेचे उत्पादन हे कोळशाच्या ऊर्जानिर्मिती प्रकल्पातून करण्यात येते. देशात कोळशावर चालणारे १५० वीजनिर्मिती प्रकल्प हे कोळशावर चालणारे आहेत. गेल्यावर्षी वीजसंकट तीव्र झाल्यानंतर, कोळसा पोहचवण्या विशेष महत्त्व देण्यात आले. त्यामुळे वीजनिर्मिती प्रकल्पापपर्यंत कोळसा पोहचवण्यासाठी रेल्वेने ६७० सामान्य रेल्वे फेऱ्या रद्द केल्या होत्या.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच