AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain update | भारतातल्या ‘या’ राज्यात पावसाच तांडव, पुढचे 24 तास महत्त्वाचे, भितीदायक फोटो आले समोर

Rain update | हे फोटो पाहून काळजीत टाकणारे, चिंता वाढवणारे आहेत. ढगफुटीमुळे डोंगरातून इतकं पाणी वाहत आलं की, कोणाला काही समजण्याची संधीच मिळाली नाही. रस्त्यात जे होतं, ते सर्व वाहून गेलं.

Rain update | भारतातल्या 'या' राज्यात पावसाच तांडव, पुढचे 24 तास महत्त्वाचे, भितीदायक फोटो आले समोर
Rain
| Updated on: Aug 14, 2023 | 9:10 AM
Share

सोलान : महाराष्ट्रात सध्या पावसाने विश्रांती घेतली असली, तर भारतातील डोंगराळ भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. डोंगराळ भागात पाऊस आणि लँडस्लाइडमुळे मोठं नुकसान झालं आहे. हिमाचल प्रदेशच्या सोलान आणि सिरमौर भागात ढगफुटी झाली. पावसामुळे तिथे लोकांच्या घरात चिखल आणि ढिगारा जमा झालाय. गाड्या वाहून गेल्या. आजही हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा अलर्ट आहे. त्यामुळे शाळा-कॉलेजेस बंद आहेत. उत्तराखंडमध्येही अशीच स्थिती आहे. डेहराडूनमध्ये शाळा-कॉलेजेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट देण्यात आलाय.

हिमाचल प्रदेशच्या नाहन विधानसभा क्षेत्रात कंडईवाला येथे मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालय. एक गोशाळेसह तीन जनावरं वाहून गेली. ढगफुटीमुळे डोंगरातून इतकं पाणी वाहत आलं की, कोणाला काही समजण्याची संधीच मिळाली नाही. रस्त्यात जे होतं, ते सर्व वाहून गेलं. राज्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. प्रशासन लोकांची मदत करत आहे.

रस्त्यावर अनेक फूट पाणी

हिमाचलच्या मंडी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गाव-शहरं सगळं पाण्याखाली गेलं आहे. शेतामध्ये पाणी भरलं आहे. शहरी भागातही वाईट अवस्था आहे. रस्त्यावर अनेक फूट पाणी भरलय. मुसळधार पावसामुळे संपूर्ण मंडी जिल्ह्यात वाईट स्थिती आहे. काही ठिकाणी ढगफुटी झाल्याची, तर काही ठिकाणाहून लँडस्लाइडची बातमी येत आहे. लोकांनी इथे-तिथे पळून जीव वाचवला

हिमाचलची राजधानी सिमलामध्ये मुसळधार पाऊस होतोय. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालय. वेगवान वारा आणि पावसामुळे अनेक झाडं गाडीवर पडली. लोकांनी इथे-तिथे पळून जीव वाचवला. राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज होतोय. ग्राऊंड झीरोचा फिडबॅक लक्षात घेऊन सीएम सुक्खू यांनी आज शिक्षण संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?