AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झोपल्या झोपल्या कुणी करोडपती होईल का हो? एकजण झालाय, होमगार्डचं आयुष्यच बदललं, फक्त झोपण्यापूर्वी त्याने काय केलं पाहा…

अचानक झालेल्या धनलाभामुळे विवेकानंदवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. या पैशांचा उपयोग तो शेती आणि शेतकऱ्यांसाठी करणार असल्याचं सांगतोय.

झोपल्या झोपल्या कुणी करोडपती होईल का हो? एकजण झालाय, होमगार्डचं आयुष्यच बदललं, फक्त झोपण्यापूर्वी त्याने काय केलं पाहा...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 07, 2023 | 12:46 PM
Share

नवी दिल्ली : झोपल्या झोपल्या कुणी करोडपती (Millionaire) होईल का? ही कल्पनाही करू शकणार नाहीत आपण. एका होमगार्डनी झोपण्यापूर्वी एक काम केलं आणि सकाळी उठेपर्यंत त्याचं आयुष्यच पालटलं. पहाटे पहाटे तो करोडपती झालाय. 31 मार्च पासून जगभरातील क्रिकेट शौकिनांच्या नजरा इंडियन प्रीमियर लीगवर खिळल्या आहेत. 16 व्या आयपीएलची (IPL) धडाकेबाज सुरुवात झाली तशी तमाम क्रिकेट प्रेमींसाठी जणू एखादा महोत्सव सुरु झालाय. उत्तर प्रदेशात होमगार्डची नोकरी करणाऱ्या विवेकानंदसाठी तर यंदाचं आयपीएल आयुष्य बदलवणारं ठरलंय. काही तासातच तो कोट्यधीश झाला आणि लक्झरी कारचा मालकही.

काय केलं नेमकं?

आयपीएल सुरु झालं की असंख्य ऑनलाइन गेमिंग अ‍ॅप्स सक्रिय होतात. लोकप्रिय खेळाडू या जाहिरातींतून झळकतात. त्यामुळे लोकही अशा अ‍ॅप्सकडे आकर्षित होतायत. काही अ‍ॅपमध्ये आपण घरात बसूनच मॅच खेळू शकतो. स्वतःची टीम बनवू शकतो. एकच काय तर २० टीमही उभारू शकतो.

30 रुपये लावले, 1 कोटी जिंकले

या सगळ्या अ‍ॅपमध्ये 49 रुपयांत 2 कोटींचे मालक व्हा आणि 30रुपयांत 1 कोटी मिळवा, या दोन ऑफर लोकप्रिय आहेत. खेळणाऱ्या सदस्याची टीम उत्तम खेळली, तर तो टॉपवर राहतो. टॉप पोझिशनची ठरलेली रक्कम त्याला बक्षीस म्हणून मिळते.

मुलाने शिकवलं गेम खेळायला

गोरखपूर येथील सिकरीगंज ठाण्यात ड्रायव्हर म्हणून विवेकानंद काम करतात. काही महिन्यांपूर्वीच त्याने हा गेम खेळायला शिकला. घराशेजारी राहणाऱ्या लहान मुलांनी त्याला गेम खेळायला शिकवलं. टीम कशी बनवायची ते सांगितलं. मागील 2 महिन्यांपासून तो गेमिंग अ‍ॅपवर टीम बनवायला शिकला होता.

आतापर्यंत 8 हजार रुपये घालवले

विवेकानंद सिंह याने 49 रुपयांपासून 150 रुपयांपर्यंत बोली लावल्या. त्यापेक्षा जास्त बोली कधी लावली नाही. पण आतापर्यंत मागील सात महिन्यात त्याने 8 हजार रुपये लावल्याचं सांगितलं. गमावलेल्या पैशांची पर्वा न करता तो थोडी थोडी बोली लावतच होता.

8 एप्रिलला रक्कम जमा होणार

आयपीएलची टीम बनवून विवेकानंद झोपी गेला. पण सकाळी उठताच तो करोडपती झाल्याचं दिसलं. दुसऱ्या दिवशी अ‍ॅपकडून त्याला फोन आला. ज्यात त्याला या बक्षीसाची माहिती देण्यात आली. त्याच्याकडून फोटो मागवण्यात आले. विवेकानंद सिंह म्हणतोय, या महिन्यात ८ तारखेला त्याच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. अचानक झालेल्या धनलाभामुळे विवेकानंदवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. या पैशांचा उपयोग तो शेती आणि शेतकऱ्यांसाठी करणार असल्याचं सांगतोय.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.