Explained : भारताची आर्थिक नौका संकटातून पार पाडली, कोणी दिला होता सल्ला ? कहाणी भारताचे सोने गहाण ठेवण्याची…

१९९१ च्या आर्थिक संकटातून देशाला वाचवण्यासाठी एका नायकाने मोठी भूमिका बजावली होती. या नायकाने बदनामी सहन करुन देखील गुप्त पद्धतीने सोने गहाण ठेवले आणि भारताला आर्थिक दिवाळखोरीपासून वाचवले होते. वाचा नेमके काय घडले होते...

Explained : भारताची आर्थिक नौका संकटातून पार पाडली, कोणी दिला होता सल्ला ? कहाणी भारताचे सोने गहाण ठेवण्याची...
RBI Governor S Venkitaramanan Real Story
| Updated on: Jun 15, 2026 | 5:25 PM

जानेवारी १९९१…ती रात्र  राजधानी दिल्लीत प्रचंड थंडी पडली होती, रात्रीच्या शांत वातावरणात राजधानी रोषणाईने चमचमत होती. मात्र, देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठे ग्रहण लागले होते. मध्य पूर्वेत युद्ध सुरु होते. आणि इकडे इंधनाचे दर भयंकर कडालले होते. महागाई डायन सर्वसामान्याच्या स्वयंपाक घरात पोहचली होती. विदेशी चलन साठी जवळपास संपल्यात जमा होता. देशाकडे मुश्कीलीन सात दिवसांची आयात करण्याऐवढे डॉलर शिल्लक होते… देशात तेव्हा अस्थिर सरकार होते. आंतरराष्ट्रीय बँक आणि गुंतवणूकदार भारताला संशयाच्या नजरेने पाहू लागले होते. आर्थिक संकट इतके विक्राळ झाले होते की जर निर्णय घेतला नाही तर देशाला उपाशी राहण्याची वेळ आली होती. कारण परकीय चलनावरच आपण देशाच्या गरज भागवू शकत होतो. देशाला इंधन, इलेक्ट्रॉनिक आणि इतर पदार्थांसाठी परकीय चलनाची नितांत गरज होती. तेव्हा एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पंतप्रधानांना एक असा सल्ला दिला, जो ऐकूण सर्वांनाच धक्का बसला – भारताचे सोने परदेशात गहाण ठेवण्याचा तो निर्णय होता. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us