
श्रावण महीना सुरू होताच अनेक सणांचेही आगमन होते. मा्त्र उत्तर भारत आणि देशातील अनेक भागांत श्रावण आधीच सुरू झाला असून त्याचे सणही आता सुरू होत आहेत. देशभरात नागपंचमीच्या दिवशी सापांना दूध पाजण्याची परंपरा आहे, परंतु आपल्याच देशात एक असं गाव आहे जिथे नागपंचमीच्या निमित्ताने नदीतून शेकडो विषारी साप बाहेर काढण्यासाठी मेळा भरतो. एवढंच नव्हे तर नदीतून बाहेर काढलेल्या सापांशी लोकं एखाद्या लहान मुलासारखं खेळतात. नागपंचमीच्या निमित्ताने, हे आश्चर्यकारक आणि भयावह दृश्य पाहण्यासाठी लोक दूरवरून येत असतात. या गावाचतं नाव काय आणि सापांशी खेळण्यामागचं हे रहस्य नेमकं आहे तरी काय ?
सापांचं गाव म्हणूनही प्रसिद्ध
या गावाचे नाव नवतोल आहे आणि हे गाव बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील मंसूरचक प्रखंडमध्ये येतं. लोक या गावाला सापांचे गाव असेही म्हणतात. कारण येथील लोक त्यांच्या परंपरेचे पालन करण्यासाठी त्यांच्या जीवाची देखील पर्वा करत नाहीत. मंगळवारी आयोजित नागपंचमीनिमित्त पुन्हा एकदा असेच दृश्य पाहायला मिळाले. नवतोल गावात, येथील लोकांनी त्यांच्या परंपरेचे पालन करण्यासाठी बालन नदीत उड्या मारल्या आणि काही वेळातच शेकडो सापांना पकडले. यावेळी, साप पकडणारे लोक गळ्यात साप लटकवून, ढोल-ताशांच्या तालावर नाचत आणि गाणी गात भगवती मंदिरात पोहोचले.
300 वर्षांपासूनची परंपरा
त शेकडो लोक हे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी या काळा नदीकाठावर पोहोचले. असे म्हटले जाते की या गावाची ही परंपरा 300 वर्ष जुनी आहे. गावातील रहिवासी रौबी दास हे भगवतीचे मोठे भक्त होते. नागपंचमीच्या निमित्ताने या ठिकाणी ही परंपरा सुरू करणारे ते पहिले होते. तेव्हापासून त्यांचे वंशज आणि गावकरी ही परंपरा पूर्ण उत्साहाने आणि भक्तीभावनेने पाळत आहेत.
या प्रथेमागचं कारण काय ?
नागपंचमीला भरणाऱ्या सर्पमेळ्याबद्दल ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, साप निसर्गातील मिथेन वायू शोषून घेतात, जो पर्यावरण संतुलनासाठी महत्त्वाचा मानला जातो. सनातन धर्मात, सापांचे हे महत्त्व ओळखण्यासाठी आणि निसर्गाशी एकरूपता राखण्यासाठी पूजा केली जाते. भगवान शिव आणि तंत्रज्ञांशी सापांचे संबंध हे नैसर्गिक महत्त्व प्रतिबिंबित करतात.