AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी अजूनही एक विद्यार्थी…, राहुल गांधींकडून ‘जेन झी’ला फ्रेंडशिप डे च्या हटके अंदाजात शुभेच्छा

विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे जेन झी सोबत संवाद साधण्यासाठी अलीकडच्या काळात सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय झाल्याचे पहायला मिळत आहेत. जागतिक मैत्री दिनाचं औचित्य साधून त्यांनी रविवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, त्यांनी जेन झी स्टाईलने फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मी अजूनही एक विद्यार्थी..., राहुल गांधींकडून 'जेन झी'ला फ्रेंडशिप डे च्या हटके अंदाजात शुभेच्छा
Rahul Gandhi Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 02, 2026 | 8:16 PM
Share

विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे जेन झी सोबत संवाद साधण्यासाठी अलीकडच्या काळात सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय झाल्याचे पहायला मिळत आहेत. जागतिक मैत्री दिनाचं औचित्य साधून त्यांनी रविवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, त्यांनी जेन झी स्टाईलने फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवर आपला फोटो पोस्ट करताना कोरियन ‘फिंगर हार्ट’ इमोजीचा वापर केला आहे. या पोस्टमध्ये आपण अजूनही एक विद्यार्थी असून दररोज काहीतरी नवीन शकत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

राहुल गांधी यांनी नेमकं काय म्हटलं?

राहुल गांधी यांनी जागतिक मैत्री दिनाच्या पार्श्वभूमीवर एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की मी अजूनही एक विद्यार्थी आहे, दररोज काहीतरी नवीन शिकत असतो. आजचा धडा हा आहे की, आज फ्रेंडशिप डे आहे, सगळ्यांना फ्रेंडशिप डे च्या शुभेच्छा, खूप सगळं प्रेम. अशी पोस्ट राहुल गांधी यांनी केली आहे. दरम्यान त्यापूर्वी शनिवारी नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबासोबत राहुल गांधी यांनी संवाद साधला होता. त्यांनी याचे काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. आपल्या मुलांना गमावण्याइतकं या जगात दुसरं कोणतंच मोठं दु:ख आई वडिलांसाठी असू शकत नाही, असंही राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. सोबतच पुन्हा एकदा नीटच्या मुद्द्यावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता.

त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की प्रत्येक आत्महत्या केलेल्या तरुणाच्या पाठीमागे असं एक कुटुंब असतं, ज्यांचं दु:ख कधीही संपत नाही. परीक्षेचे पेपर लीक होणं, परीक्षा रद्द होणं आणि विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी जी काही तयारी केली आहे तिच्यावर पाणी फिरणं हे सर्व सध्याच्या शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण करत आहे.

Follow Us
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश