TV9 Exclusive: 50 वर्षांपासून जुनं घर, ना घरात बेड, मुलीच्या घरात नोटांचा डोंगर यावर विश्वास बसत नाही, काय म्हणतेय भ्रष्टाचार प्रकरणातील अर्पिताची आई?

| Updated on: Jul 26, 2022 | 5:22 PM

अर्पिताचे वडील केंद्र सरकारच्या नोकरीत होते. नोकरीच्या काळात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अर्पिताला त्यांच्या जागी नोकरी मिळू शकत होती, मात्र अर्पिताला मॉडेलिंग करायचे असल्याने तिने ती ऑपर नाकारल्याचे आईने सांगितले आहे. अर्पिताच्या आईही स्वत: सेल टॅक्स अधिकारी होत्या. अर्पिताला सिनेमात जाण्याची इच्छा असल्याने त्यांनीही तिच्यावर नोकरीसाठी दबाव टाकला नाही.

TV9 Exclusive: 50 वर्षांपासून जुनं घर, ना घरात बेड, मुलीच्या घरात नोटांचा डोंगर यावर विश्वास बसत नाही, काय म्हणतेय भ्रष्टाचार प्रकरणातील अर्पिताची आई?
50 कोटींची कॅश आणि 5 किलो सोनं सरकारजमा
Image Credit source: twitter
Follow us on

कोलकाता – शिक्षक भरती घोटाळ्यात पश्चिम बंगालचे मंत्री (W. Bangal minister)पार्थ चॅटर्जी आणि त्यांच्या नीकटवर्तीय अर्पिता मुखर्जी (Aprpita Mukharjee)यांना अटक करण्यात आलेली आहे. अर्पिता मुखर्जी यांच्या घरात 21 कोटी रुपयांची कॅश आणि 1 कोटींचे दागिने सापडले होते. अटकेत असलेल्या अर्पिता मुखर्जी यांच्या आईने (mother)TV9शी बातचित केली आहे. अर्पिताकडे एवढे पैसे आले कुठून, याचा त्यांनाही मोठा धक्का बसलेला आहे. चार दिवसांपूव्री आर्पिता आपल्याला भेटायला आली होती, असेही त्यांनी सांगितले आहे. तिच्याकडे एवढे पैसे आले कुठून, हे माहित नसल्याचेही अर्पिता यांच्या आईने सांगितले आहे. आपण एका 50 वर्षांपासूनच्या जुन्या घरात राहत असल्याचेही अर्पिताच्या आईचे म्हणणे आहे. आपल्याकडे झोपायला साधा बेडही नसल्याचे त्या सांगतात. केवळ आई आहोत म्हणून अर्पिता भेटायला येत असे, तिने एका पैशाचीही मदत आपल्याला कधी केली नाही, याचे दु:खही त्या व्यक्त करतात. अर्पिताला यात फसवण्यात आल्याचा संशय असल्याचे त्यांच्या आईचे म्हणणे आहे. तपासात या सगळ्या बाबी समोर येतील असा त्यांना विश्वास वाटतोय.

चुकीची वागली असेल तर शिक्षा होईल

त्यांच्याकडे वकील असल्याचे अर्पिताच्या आईने सांगितले आहे. या वकिलांची मदत घेणार असल्याचेही त्यंनी सांगितले आहे. जर अर्पिताने चुकीचे केले असेल तर तिला शिक्षा मिळेल, असेही त्यांनी सांगितले आहे. प. बंगालचे मंत्री आणि या भ्रष्टाचार प्रकरणातील प्रमुख आरोपी पार्थ चॅटर्जी एकदा आपल्या घरी आले होते, असेही त्यांनी सांगितले आहे. पार्थ जास्त बोलत नसत, असेही त्यांनी सांगितले. पार्थ हे आपले नातेवाईक असल्याचे अर्पिताने शेजाच्यांना सांगितले होते. अर्पिता शेजारच्यांशी फार बोलत नसे आणि कुणालाही भेटत नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

अर्पिताच्या आईची गुजराण पेन्शनवर

अर्पिता आधी हिरॉईन होती, त्यानंतर ती मॉडेलिंग करायला लागली, असे तिच्या आईने सांगितले आहे. काही सिरियल्स आणि सिनेमांतूनही अर्पिताने काम केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अर्पिताचे वडील केंद्र सरकारच्या नोकरीत होते. नोकरीच्या काळात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अर्पिताला त्यांच्या जागी नोकरी मिळू शकत होती, मात्र अर्पिताला मॉडेलिंग करायचे असल्याने तिने ती ऑपर नाकारल्याचे आईने सांगितले आहे. अर्पिताच्या आईही स्वत: सेल टॅक्स अधिकारी होत्या. अर्पिताला सिनेमात जाण्याची इच्छा असल्याने त्यांनीही तिच्यावर नोकरीसाठी दबाव टाकला नाही. अर्पितांच्या आईला मिळणाऱ्या पेन्शनमधून त्यांचा खर्च चालतो, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या घरात कूलकर, फ्रिजही नाही. घरात केवळ एक पंखा आणि ट्यूबलाईट आहे.

हे सुद्धा वाचा

अर्पिताने लग्नही केले नव्हते

अर्पिता आठवड्यातून दोनदा आपलव्याला भेटायला येत असल्याचे त्यांच्या आईने सांगितले आहे. भेटून ती परत जात असे. घरात ती अतिशय साधेपणाने राहत असल्याचेही त्यांनी सांगितले. अर्पिताने लग्नही केले नव्हते. शेजारच्यांशीही ती बोलत नसे. तिच्या करिअरबद्दल तिने कधीही आपल्याला काही सांगितले नसल्याचेही आईने सांगितले आहे. तिच्याकडे 21 कोटी मिळाले, मालमत्तेची कागदपत्रे मिळाल्याचे लोकं सांगतायेत, हे सगळं देवालाच माहित असंही त्यांच्या आईने सांगितलं आहे.

कोण आहे अर्पिता मुखर्जी?

अर्पिता मुखर्जी एक अभिनेत्री आहे. तिने बांग्ला, तामिळ, उडिया सिनेमांत कामं केलेली आहेत. पार्थ चॅटर्जींची नीकटवर्तीय अशीही तिची ओळख आहे. पार्थ चॅटर्जी यांच्या दुर्गा मंडपाचे कामही अर्पिता पाहत असे. शनिवारी ईडीने टाकलेल्या धाडीत अर्पिताच्या घरातून 21 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केी होती. त्यानंतर बंगालचे राजकीय वातावरण तापले आहे.