IAS जोडप्याच्या लग्नाची गोष्ट ! ना बँड-बाजा ना वरात, मिनी सचिवालयात झाले शुभमंगल

लग्न म्हटले की लोक कर्ज काढून थाटामाटात विवाह करतात. मात्र, एका आयएएस जोडप्याने अत्यंत साध्या पद्धतीने विवाह करुन लोकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

IAS जोडप्याच्या लग्नाची गोष्ट ! ना बँड-बाजा ना वरात, मिनी सचिवालयात झाले शुभमंगल
IAS wedding
| Updated on: Feb 20, 2026 | 12:24 PM

साल २०२३ बॅचचे IAS अधिकारी माधव भारद्वाज आणि अदिती वासने यांनी राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील मिनी सचिवालयात लग्न केले आहे. या दरम्यान कोणताही बँडबाजा नव्हता की वरात निघाली नाही.अत्यंत साधेपणाने जिल्हा कलेक्टर अर्पिता शुक्ला यांच्या समोर दोघांनी त्यांचा विवाह रजिस्टर केला. यावेळी दोघांचे आई-वडील आणि भावंडे उपस्थित होते. माधव भारद्वाज अलवर येथे SDM पदावर कार्यरत आहेत. तर अदिती वासने गुजरातच्या जामनगरातील SDM आहेत.

देशभरात लग्न समारंभावर लाखो रुपयांची उधळपट्टी करीत श्रीमंतीचा देखावा केला जातो. परंतू अलवर येथील मिनी सचिवालयात दोघा आएएस अधिकाऱ्याचा विवाह चर्चेचा विषय ठरला आहे. उत्तराखंड मसूरीतील निवासी राजकुमार भारद्वाज यांचे पुत्र माधव भारद्वाज अलवर येथे एसडीएम पदावर तैनात आहेत. त्यांची पत्नी अदिती वासने मुळची युपीच्या बरेली जिल्ह्यातील रहिवासी आहे. अदिती वासने हीचे वडील व्यापारी आहेत. अदितीला तीन भाऊ-बहिण आहेत.

कलेक्टर ऑफीसात रजिस्टर्ड लग्न

दोघांनी अत्यंत साध्या पद्धतीने जिल्हा कलेक्टर अर्पिता शुक्ला यांच्या समोर १८ फेब्रुवारी रोजी त्यांच्या विवाहाची नोंदणी केली. यावेळी त्यांचे मोजके कुटुंबिय हजर होते. आयएएस माधव आणि अदिती यांनी सांगितले की दोघांची भेट ट्रेनिंग दरम्यान झाली होती. नंतर त्यांचे मैत्रीचे नाते प्रेमात बदलले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही अधिकाऱ्यांनी कुटुंबाच्या परवानगीने बुधवारी अलवर जिल्हा कलेक्टर अर्पिता शुक्ला समोर त्यांच्या विवाहाची नोंदणी केली. त्यावेळी मिनी सचिवालयाचे अधिकारी उपस्थित होते.
या लग्नाचे लग्नाचे खुब चर्चा होत आहे

प्रशासनात या लग्नाची खुप चर्चा होत आहे. समाजात इतक्या मोठ्या पदावर असलेल्या या जोडप्याने सिद्ध केले आहे की परंपरा आणि नात्यांसाठी देखावा उपयोगी नाही. केवळ मने एकत्र येणे गरजेचे आहे. साध्यापणाने विवाह केल्याने हेच पैसे पुढे भविष्यात कामी येऊ शकतात. सोशल मीडियावर या साध्या आयएएस जोडप्याच्या लग्नाची चर्चा होत आहे.

 

Follow Us